Lokmat Money > बिझनेस न्यूज > RITES ltd share price: रेल्वे स्टॉक देणार एकावर एक बोनस शेअर, डिविडंडही मिळणार; शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ

RITES ltd share price: रेल्वे स्टॉक देणार एकावर एक बोनस शेअर, डिविडंडही मिळणार; शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ

RITES ltd share price: सरकारी रेल्वे कंपनीचे स्टॉक्स आज एक्स-बोनस आणि एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करत आहेत. या शेअर्सच्या किंमतीत शुक्रवारी १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 02:27 PM2024-09-20T14:27:46+5:302024-09-20T14:32:08+5:30

RITES ltd share price: सरकारी रेल्वे कंपनीचे स्टॉक्स आज एक्स-बोनस आणि एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करत आहेत. या शेअर्सच्या किंमतीत शुक्रवारी १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

RITES ltd share price Railway stock will give one bonus share for one will also get dividend 12 percent increase in the share | RITES ltd share price: रेल्वे स्टॉक देणार एकावर एक बोनस शेअर, डिविडंडही मिळणार; शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ

RITES ltd share price: रेल्वे स्टॉक देणार एकावर एक बोनस शेअर, डिविडंडही मिळणार; शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ

RITES ltd share price: सरकारी रेल्वे स्टॉक राइट्स लिमिटेडचे शेअर्स आज एक्स-बोनस आणि एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करत आहेत. कंपनी प्रत्येक शेअरवर एका बोनस शेअर आणि पाच रुपये लाभांश देत आहे. राइट्स लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत शुक्रवारी १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

पात्र गुंतवणूकदारांना एकावर एक बोनस शेअर दिला जाईल, असं राइट्स लिमिटेडनं शेअर बाजारांना सांगितलं होतं. कंपनी प्रत्येक शेअरवर ५ रुपये डिविडंड स्टॉक देखील देत आहे. कंपनीनं बोनस शेअर्स आणि डिव्हिडंडसाठी २० सप्टेंबर २०२४ ही विक्रमी तारीख निश्चित केली होती. जे आज आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावं आज कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहतील, त्यांनाच लाभांश आणि बोनस शेअर्सचा लाभ मिळेल.

गुरुवारच्या बंदच्या तुलनेत आज बीएसईवर कंपनीचा शेअर ३६२.९५ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत १२ टक्क्यांहून अधिक वाढून ३८३.८५ रुपयांवर पोहोचली. राइट्स लिमिटेडनं यापूर्वी २०१९ मध्येदेखील बोनस शेअर दिले होते.

राइट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये वाढ

गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ८.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत १७ टक्के नफा झाला आहे. राइट्स लिमिटेडनं एका वर्षात ४२ टक्के परतावा दिलाय. जून २०२४ च्या तिमाहीपर्यंत कंपनीत सरकारचा ७२.२० टक्के हिस्सा होता. तर जनतेचा वाटा १३.५० टक्के होता. म्युच्युअल फंडांचा या शेअरमध्ये ३.३२ टक्के हिस्सा आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: RITES ltd share price Railway stock will give one bonus share for one will also get dividend 12 percent increase in the share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.