Join us

Nitin Gadkari: इलेक्‍ट्र‍िक वाहनधारकांना सरकारचं आणखी एक गिफ्ट! गडकरींनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 9:36 AM

Delhi to Mumbai Electric Highway: 'या महामार्गावर आपण ट्रॉलीबसप्रमाणेच ट्रॉली ट्रकही चालवू शकता.'

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशातील नागरिकांना सातत्याने काही ना काही गोड बातमी देतच ​​असतात. यावेळी त्यांनी, दिल्ली-मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे म्हटले आहे. ते गुडगाव येथे हायड्रॉलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याची सरकारची योजना - गडकरी म्हणाले, सरकार दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याचा विचार करत आहे. इलेक्ट्रिक महामार्ग म्हणजे, साधारणपणे असा महामार्ग, ज्यावर धावणाऱ्या वाहनांसाठी विजेची व्यवस्था करण्यात आलेली असते. ही वीज रस्त्यावर असलेल्या तारांच्या माध्यमाने वाहनांपर्यंत पोहोचविली जाते.

सर्व जिल्हे चार पदरी महामार्गांनी जोडले जाणार - या योजनेसंदर्भात अधिक माहिती न देता गडकरी म्हणाले, 'या महामार्गावर आपण ट्रॉलीबसप्रमाणेच ट्रॉली ट्रकही चालवू शकता.' ट्रॉलीबस ही एक इलेक्ट्रिक बस आहे, जी ओव्हरहेड तारांपासून होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यावर चालते. याशिवाय, आपल्या मंत्रालयाने सर्व जिल्हे चार पदरी रस्त्यांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सरकार 2.5 लाख कोटी रुपयांचे बोगदेही तयार करत आहे, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.सर्व सेवा डिजिटल करणे आवश्यक - गडकरी म्हणाले, राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्व सेवा डिजिटल करणे आवश्यक आहे. यापूर्वी गडकरी यांनी पुढील एक ते दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोलवरील वाहनाच्या बरोबरीत येईल, असे म्हटले होते. खरे तर, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, सध्या या वाहनांची किंमत फार अधिक असल्याने, लोकांचा ओढा या वाहनांकडे कमी आहे.

टॅग्स :नितीन गडकरीइलेक्ट्रिक कार / स्कूटरभाजपामहामार्ग