सॅन फ्रॅन्सिस्काे : उद्याेगपती इलाॅन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. आता कंपनीत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नाेकरीवरही कुऱ्हाड काेसळली आहे.
त्यांची जागा आता राेबाेट घेणार आहेत. तर दुसरीकडे मस्क यांनी कंपनीच्या कार्यालयातील फर्निचर व इतर वस्तू लिलावात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जानेवारीपासून लिलावास सुरुवात हाेईल.कंपनीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत गेल्या आठवड्यात कल्पना देण्यात आली हाेती. नाेकरी धाेक्यात आहे, असे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी हरताळही केला. मात्र, त्यानंतर त्यांना तत्काळ हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणाची तपासणी करण्यात येत असून मस्क यांनी कामगार कायदा माेडला आहे का, याची चाैकशी हाेत आहे. (वृत्तसंस्था)
काॅफी मशिन्स, फ्रीज, खुर्च्यांचाही लिलावसॅन फ्रॅन्सिस्काे मुख्यालयातील २६५ वस्तूंचा लिलाव करण्यात येईल. त्यात काॅफी मशिन्स, ओव्हन, फ्रीज, फर्निचर, इलेक्ट्राॅनिक्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. बहुतांश वस्तूंची सुरुवातीची किंमत २५ व ५० डाॅलर्स एवढी ठेवली आहे.
ट्विटर ब्ल्यू पुन्हा सुरूअनेक तांत्रिक अडचणींनंतर ट्विटरने ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन सेवा साेमवारी पुन्हा लाॅंच केली. त्यासाठी वेब युझर्सला ८ डाॅलर्स दरमहा माेजावे लागतील. तर आयफाेनधारकांसाठी हे शुल्क दरमहा ११ डाॅलर्स एवढे असेल.
महिलांसाेबत भेदभाव?आम्ही नाेकरी गमाविली असून या कर्मचारी कपातीचा महिलांवर प्रतिकूल प्रभाव पडल्याचे सांगत दाेन महिलांनी ट्विटरवर खटला दाखल केला आहे. कपात करताना महिलांसाेबत भेदभाव केल्याचा आराेप त्यांनी केला आहे.