संतोष येलकर, अकोला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या साप्ताहिक अहवालानुसार १६ जानेवारीपर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ग्रामपंचायत यंत्रणा स्तरावर रोहयो अंतर्गत ५ हजार ८१६ कामे सुरू आहेत. या कामांवर ७८ हजार ९३८ मजूर काम करीत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आठवड्यात राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण २२ हजार ९४९ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील या कामांमध्ये शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, शेततळे, बंधारे व इतर कामांचा समावेश आहे.
रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या या कामांमध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत ५ हजार ८१६ कामे सुरू असून, या कामांवर ७८ हजार ९३८ मजूर काम करीत आहेत. त्यामध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ४ हजार ४६४ आणि विविध यंत्रणा स्तरावर १ हजार ३५२ कामे सुरू आहेत. १६ जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा राज्यातील रोहयो कामांवर २९ हजार ७६२ मजुरांची उपस्थिती वाढली. त्यामध्ये सर्वात जास्त गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, परभणी, पालघर, चंद्रपूर, लातूर, नंदूरबार, धुळे व इतर १७ जिल्ह्यांमध्ये मजूर उपस्थितीत वाढली आहे.
पाच जिल्ह्यांत ‘रोहयो’ची पाच हजारांवर कामे सुरू!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या साप्ताहिक अहवालानुसार १६ जानेवारीपर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ग्रामपंचायत यंत्रणा स्तरावर रोहयो
By admin | Published: January 22, 2016 03:06 AM2016-01-22T03:06:10+5:302016-01-22T03:06:10+5:30