Join us

'रोमान्स स्कॅम'ने उडाली तरुणांची झोप! फक्त हृदयच नाही तर तुमचाही खिसाही होईल खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:17 IST

Romance Scam : व्हॅलेटाईन डेच्या काळात रोमान्स स्कॅम सक्रीय झाल्यापासून अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.

Romance Scam : नुकताच देशरात व्हॅलेटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण सप्ताहात पर्यटन स्थळ, बागांमध्ये प्रेमी युगूलच दिसत होते. सोशल मीडियालाही प्रेमाचा रंग चढला होता. अशा परिस्थिती सिंगल लोकांचे खूप हाल झाले. मात्र, यातून बाहेर पडण्यासाठई तरुण आता इंटरनेटचा आधार घेत आहेत. तुम्हीही असे करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, सोशल मीडियावर पुन्हा एकदा रोमान्स स्कॅम सक्रीय झाला आहे. सिंगल लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची बँक खाती रिकामी केली जात आहे. मूडीजच्या रिपोर्टनुसार, असे स्कॅम होण्याच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या नंबरवर आहे. यावरुन याची व्याप्ती लक्षात येते. या घोटाळ्यात फक्त तुमचं हृदय नाही तर खिसाही खाली होऊ शकतो. 

रोमान्स स्कॅम कसा होतो?सध्या बाजारात अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करुन रोमान्स स्कॅम केला जात आहे. याप्रकरणात डेटिंग अ‍ॅप्सवरुन मुलींच्या नावाने तरुणांशी मैत्री केली जाते. हळूहळू या तरुणांच्या प्रेमात पडल्याचं नाटक केलं जातं. सायबर गुन्हेगार यासाठई 'लव्ह बॉम्बिंग' सारखे तंत्र वापरत आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव केला जातो. सतत संदेश, कॉल आणि भेटवस्तूंद्वारे आपलं खरोखरच प्रेम असल्याचे भासवतात. मी तुझ्याशिवाय एकही क्षण राहू शकत नसल्याचे उत्कट प्रेमाचे नाटक केले जाते. अशावेळी तरुण मुलेही भावनिकरित्या या तरुणींशी जोडले जातात आणि इथून खरा खेळ सुरू होतो

बकरा फसल्याची खात्री होताच. एक दिवशी अचानक कॉल करुन मेडिकल इमर्जन्सी, व्यवसायात तोटा किंवा इतर कोणत्याही कारणाने मोठ्या पैशांची गरज असल्याचे भासवले जाते. याशिवाय काही घोटाळेबाज बँक तपशील, गिफ्ट कार्ड किंवा पर्सनल फोटोग्राफ मागतात, ज्याचा वापर नंतर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो.

स्कॅमसाठी एआयचा वापरइंटरनेटचा स्पीड आणि एआय तंत्रज्ञानाच्या या युगात स्कॅमर देखील हायटेक बनले आहेत. सायबर गुन्हेगार आता एआयच्या मदतीने तयार केलेल्या व्हिडीओंचा वापर पीडितांना सावज बनवण्यासाठी करताना समोर आलं आहे. एआयच्या माध्यमातून वास्तविक दिसणारे व्हिडिओ कॉल केले जातात. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आपल्यासोबत एखादी तरुणीच असल्याचे वाटते. प्रत्यक्षात हा सर्व एआयचा खेळ आहे.

सोशल मीडिया कंपन्यांकडून सेफ्टी फीचर्ससायबर ठगांना रोखण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. मेटाने अलीकडे एक नवीन फीचर्स सादर केलं आहे. तुम्ही जर संशयास्पद अकाउंटसोबत संवाद साधत असल्यास ते तुम्हाला अलर्ट पाठवते. फेसबुक मेसेंजरमध्ये 'सेफ्टी नोटीस' फीचर सक्रिय करण्यात आले आहे. व्हॉट्सॲपने 'सायलेंस अननोन कॉलर्स' फीचर जोडले आहे, ज्याद्वारे यूजर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करू शकतात. हे संभाव्य स्कॅमर टाळण्यास मदत करेल.

रोमान्स स्कॅम कसा रोखायचा?

  • तुम्ही ऑनलाइन डेटिंग करत असाल किंवा सोशल मीडियावर नवीन लोकांशी संपर्क साधत असाल तर काही महत्त्वाची खबरदारी घ्या. 
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कधीही पैसे पाठवू नका.
  • बँक तपशील आणि वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.
  • जर एखादी व्यक्ती खूप लवकर प्रेम व्यक्त करत असेल तर सावध रहा.
  • ऑनलाइन प्रोफाइल नीट तपासा आणि जेव्हा शंका असेल तेव्हा Google रिव्हर्स इमेज सर्च वापरा.
  • व्हिडिओ कॉलवर चॅट करुन समोर कोण आहे? याची तपासणी करा.
टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीसोशल मीडिया