मुंबई : टाटा सन्सचे स्वतंत्र संचालक आणि माजी मुत्सद्दी रोनेन सेन यांनी सायरस मिस्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडले. मिस्त्री यांनी आपल्याला सोयीची असलेली माहिती फोडून स्वयंकेंद्रित प्रवृत्तीचे दर्शन घडविल्याचे सेन यांनी म्हटले आहे. मिस्त्री यांच्या कथित कामगिरीचे कौतुक केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
रोनेन सेन यांनी आपल्या कामगिरीचे कौतुक केले होते, तसेच आपल्याविरोधात नंतर त्यांनी मतदानही केले, असा दावा सायरस मिस्त्री यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये केला होता. हा ई-मेल नंतर माध्यमांच्या हाती लागला होता. या पार्श्वभूमीवर सेन यांनी सांगितले की, माजी चेअरमनशी (सायरस मिस्त्री) संबंधित सूत्रांनी अंतर्गत कागदपत्रे निवडक आणि अंतस्थ हेतूने फोडली.
त्यातून संचालकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढेल की कमी होईल? प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सेन आणि अन्य एक स्वतंत्र संचालक फरिदा खंबाटांनी सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सचे चेअरमन या नात्याने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली होती.
परंतु, जेव्हा मिस्त्री यांना पदावरून हटविण्यासाठी मतदान घेण्यात आले तेव्हा सेन आणि अन्य एक सदस्य विजय सिंह यांनी मिस्त्री यांच्या विरोधात मत दिले. (प्रतिनिधी)
रोनेन सेन यांचे मिस्त्रींवर टीकास्त्र
टाटा सन्सचे स्वतंत्र संचालक आणि माजी मुत्सद्दी रोनेन सेन यांनी सायरस मिस्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडले.
By admin | Published: November 5, 2016 04:17 AM2016-11-05T04:17:06+5:302016-11-05T04:17:06+5:30