बंगळुुरु : आॅनलाइन विक्री करणाऱ्या वेबसाइट्सने धमाकेदार आॅफर्स आणल्यानंतर कंपन्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. विक्रीचा आकडा आणि नव्याने नोंदणी होणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
फ्लिपकार्टने एका तासातच पाच लाख प्रॉडक्ट विकल्याचा दावा केला आहे. सणासुदीनिमित्त कंपनीचा ‘बिग बिलियन डे’ सेल सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीनिमित्त अनेक कंपन्या यंदा आॅनलाईन विक्रीच्या मैदानात उतरल्या आहेत.
ई- कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने सांगितले की, कंपनीचा सणासुदीनिमित्तचा सेल रविवारपासून सुरु झाला. अगदी पहिल्या पाच मिनिटातच ग्राहकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, २०१५ मध्ये कंपनीच्या बिग बिलियन डेमध्ये पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या प्रॉडक्टपेक्षा अधिक प्रॉडक्ट फक्त सहा तासातच विकले गेले आहेत. सणासुदीनिमित्त सुरु झालेल्या विविध कंपन्यांच्या आॅनलाईन सेलला भरभरुन प्रतिसाद मिळत असताना स्नॅपडीलला एका तासात वीस लाख नागरिकांनी आॅनलाईन भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (वृत्तसंस्था)
आॅनलाइन विक्रीला छप्पर फाडके प्रतिसाद
आॅनलाइन विक्री करणाऱ्या वेबसाइट्सने धमाकेदार आॅफर्स आणल्यानंतर कंपन्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे
By admin | Published: October 3, 2016 06:28 AM2016-10-03T06:28:53+5:302016-10-03T06:28:53+5:30