Join us  

फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना सोलर पॅनेल बसवता येणार; Zerodha च्या नितीन कामत यांनी सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 8:21 PM

Nithin Kamath: झिरोधाचे सीईओ नितीन कामत यांनी रुफटॉप सोलार पॅनेल बसवण्यासाठी एक उपाय सांगितला आहे.

Nithin Kamath on Rooftop Solar  : केंद्र सरकार गेल्या काही काळापासून रुफटॉप सोलर योजनेचा जोरदार प्रचार करत आहे. जे लोक आपल्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवतात, त्यांना पीएम सूर्य घर मुफ्त बिजली  (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) योजनेतूनही अनुदान दिले जाते. पण, Zerodha चे CEO नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक या योजनेचा फायदा कसा घेऊ शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या तरी यावर उपाय नाही, त्यामुळेच अनुदान असूनही केवळ 10 टक्के घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवता आले आहे. लोकांना वीज निर्मितीत योगदान द्यायचे आहे, पण जागा नसल्यामुळे त्यांना काही करता येत नाही.

भारतीय स्टार्टअप संडेग्रिड्सने समस्या सोडवलीनितीन कामत यांनीच या समस्येवर उपाय सांगितला आहे. ते म्हणाले की, संडेग्रिड्स(SundayGrids) या भारतीय स्टार्टअपने या समस्येवर तोडगा काढला आहे. हे लोक सोलर पॉवर प्लांट बसवतात. तसेच लोकांना त्यात सहभागी होण्याची संधी देतात. त्यांच्या मदतीने तुम्ही क्रेडिट मिळवू शकता. हे वीज बिल कमी करण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला वेगळा सोलर पॅनल बसवण्याची गरज नाही. दूर कुठेतरी बसवलेल्या सोलर प्लांटमध्ये सहभागी होऊन तुम्ही स्वतःची वीज निर्माण करू शकता. संडेग्रीड्स आता संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहेत.

थर्ड पार्टी सोलर मॉडेल्सना सरकारचे प्रोत्साहननितीन कामत पुढे म्हणतात, केंद्र सरकारसोबतच अनेक राज्य सरकारांनीही थर्ड पार्टी सोलर मॉडेल्सचा प्रचार सुरू केला आहे. फ्लॅट्समध्ये राहणाऱ्यांना सौरऊर्जा निर्माण करण्याची ही चांगली संधी आहे. इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळून हा क्लाउड सोलर सुरू केला आहे. यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो.

संडेग्रिड्स देते. कम्युनिटी सोलारची सुविधासंडे ग्रिडचे हे सोलर फार्म लोकांना कम्युनिटी सोलार सुविधा पुरवत आहेत. अनेक लोक एकत्र येऊन त्यांच्या घराच्या छताऐवजी एकाच ठिकाणी सोलर पॅनल बसवू शकतात. ही प्रणाली अमेरिकेत लोकप्रिय झाली आहे. नुकताच दिल्लीत कम्युनिटी सोलरचा प्रस्ताव मांडण्यात आला. याशिवाय हा स्टार्टअप व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींवरही काम करत आहे. लोकांच्या पैशातून छतावर सौर पॅनेल बसवून वीज तयार केली जाते. परंतु, यातून मिळणारा महसूल त्या लोकांना जातो ज्यांनी स्वतःच्या पैशातून हे सोलर पॅनल बसवले आहेत.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकवीज