Lokmat Money > बिझनेस न्यूज > राकट एसयूव्हीची भारतीयांना भुरळ!

राकट एसयूव्हीची भारतीयांना भुरळ!

भारतीय वाहन कंपन्यांनी एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल श्रेणीतील वाहने सादर केल्यानंतर, या वाहनांना सातत्याने उदंड प्रतिसाद लाभत आहे.

By admin | Published: May 11, 2016 03:21 AM2016-05-11T03:21:03+5:302016-05-11T03:21:03+5:30

भारतीय वाहन कंपन्यांनी एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल श्रेणीतील वाहने सादर केल्यानंतर, या वाहनांना सातत्याने उदंड प्रतिसाद लाभत आहे.

Rookie SUV Indians in love! | राकट एसयूव्हीची भारतीयांना भुरळ!

राकट एसयूव्हीची भारतीयांना भुरळ!

मुंबई : भारतीय वाहन कंपन्यांनी एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल श्रेणीतील वाहने सादर केल्यानंतर, या वाहनांना सातत्याने उदंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात देशात तब्बल ६२ हजार १७० एसयूव्हींची विक्री झाली असून, हा गेल्या ३ वर्षांतील उच्चांक ठरला आहे.
एसयूव्हीच्या लोकप्रियतेमागची कारणमीमांसा करताना वाहन अभ्यासक कैलास राजस्वामी म्हणाले की, मुळात या गाड्यांची बांधणी अतिशय दणकट असते. तसेच, मुख्य मुद्दा म्हणजे, ग्राउंड क्लिअरन्सचा. अर्थात, जमिनीपासून गाडीच्या प्लॅटफॉर्मची उंची. ही उंची अन्य हॅचबॅक अथवा सेदान श्रेणीतील गाड्यांपेक्षा निश्चित जास्त असते. तसेच, टायरची रुंदीदेखील भक्कम असते.
याखेरीज वैशिष्ट्य म्हणजे, इंजिनची क्षमता तर दणकट असतेच पण त्या दणकट इंजिन क्षमतेचा वापर करत वेगाने पळण्याची किमया साधण्यासाठी यातील बहुतांश मॉडेल्स ही ‘फोर व्हील ड्राईव्ह’ असतात. सामान्य गाडीमध्ये मागील दोन चाके ही ड्राईव्ह मोडची असतात. त्यामुळे सामान्य रस्त्यांसोबत, दुर्गम भागातून आणि खडकाळ रस्त्यांतून ही वाहने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवास करतात आणि असे दणकट वाहन चालविणाऱ्या वाहकास रस्त्यावरील खाच-खळग्यांचा त्रास होऊ नये म्हणून, त्या गाडीच्या शॉकअ‍ॅब्जॅरर्बरची विशेष काळजी घेतलेली असते.
अशा विविध सुविधा असूनही इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर कसे राखता येईल, याचाही विचार वाहन कंपन्यांनी केल्यामुळे एसयूव्ही वाहनांना मागणी वाढत असल्याचे ते म्हणाले. त्याचसोबत, अलीकडच्या काळात काही प्रमुख कंपन्यांनी आपली एसयूव्ही मॉडेल्सही ‘सीएनजी’ इंधनावर सादर केल्यामुळे वाहनप्रेमींसाठी ती एक पर्वणीच ठरली आहे. (प्रतिनिधी)
12
नवीन मॉडेल लवकरच
दरवर्षी भारतात कार्यरत वाहन कंपन्यांतर्फे साधारणपणे
३० नवीन मॉडेल्स सादर होतात. गेल्या वर्षी ३०पैकी
९ वाहने ही एसयूव्ही श्रेणीतील होती. माहितीनुसार, यंदा जी ३० ते ३२ नवीन वाहने सादर होतील त्यापैकी किमान १२ वाहने ही एसयूव्ही श्रेणीतील असतील.
> एसयूव्हींना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतून जोमाने मागणी आहे. गेल्या तीन वर्षांत विक्री झालेल्या आकड्यांची तपासणी केली तर ग्रामीण आणि शहरी भागातील मागणी ६० व ४० टक्के अशी विभागलेली दिसते. तर एखादवर्षी विक्रीचा हा आकडा ५०-५० टक्के असल्याचेही दिसले आहे.
> किमती कमी झाल्याने पडला फरक
तरीही या वाहनांकडे असलेला वाहनप्रेमींचा ओढा लक्षात घेत वाहन कंपन्यांनी गेल्या चार वर्षांपासून एसयूव्ही बाजाराकडे नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष देत, साडे सहा लाख रुपये एवढ्या किमतीपासून ही वाहने उपलब्ध केल्यामुळे या वाहनांवर आता ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.

Web Title: Rookie SUV Indians in love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.