Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३७००००००००० च्या घोटाळ्याची कहाणी...! कधीकाळी प्रत्येकाच्या खिशात होता Rotomac पेन

३७००००००००० च्या घोटाळ्याची कहाणी...! कधीकाळी प्रत्येकाच्या खिशात होता Rotomac पेन

विक्रम कोठारी परदेशात गेलेल्या वृत्तानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये विक्रमला पहिल्यांदा अटक केली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:10 AM2023-03-07T11:10:27+5:302023-03-07T11:11:50+5:30

विक्रम कोठारी परदेशात गेलेल्या वृत्तानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये विक्रमला पहिल्यांदा अटक केली होती

rotomac scam is worth rs 37000000000, vikram kothari took loan | ३७००००००००० च्या घोटाळ्याची कहाणी...! कधीकाळी प्रत्येकाच्या खिशात होता Rotomac पेन

३७००००००००० च्या घोटाळ्याची कहाणी...! कधीकाळी प्रत्येकाच्या खिशात होता Rotomac पेन

नवी दिल्ली - "बारातियो का स्वागत पान पराग से करेंगे..." ही पंच लाईन तुम्ही ऐकली असेलच. टीव्हीवरील या जाहिरातीने 'पान पराग' पान मसाला घराघरात पोहोचवला. क्वचितच असा कोणी असेल ज्याला या कंपनीबद्दल माहिती नसेल, पण आज पान परागबद्दल नाही तर त्याच्याशी संबंधित पेन आणि स्टेशनरी वस्तू बनवणाऱ्या रोटोमॅकबद्दल सांगणार आहोत. पान पराग कंपनीचे मालक मनसुखभाई कोठारी यांचा मुलगा विक्रम कोठारी याने रोटोमॅक कंपनी सुरू केली, पण कर्जाच्या विळख्याने काही वर्षांतच कंपनी जमिनीवर आली. विक्रम कोठारी यांनी ३७००००००००० रुपयांच्या घोटाळ्याची कहाणी त्याच पेनने लिहिली जी ९० च्या दशकात प्रत्येकांच्या खिशात होती, टीव्ही जाहिरातींमध्ये सलमान खान, रवीना टंडन सारखे स्टार्स पेनला प्रमोट करत होते. 

सन १९९२ मध्ये रोटोमॅक कंपनीची पायाभरणी झाली. मिनरल वॉटर ब्रँड येसदेखील लाँच करण्यात आला. याशिवाय, पान पराग कंपनीने रियर स्टेट, तेल उद्योग, शाळा आणि शिक्षण क्षेत्रात विस्तार केला. १९९९ मध्ये दोन्ही भावांमध्ये वाटपाची परिस्थिती निर्माण झाली होती. रोटोमॅकच्या पडझडीची कहाणी कर्जापासून सुरू झाली. कंपनीचे प्रवर्तक विक्रम कोठारी यांच्यावर कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आणि कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप होता. विक्रम कोठारी यांनी सात बँकांकडून कर्ज घेतले मात्र ते फेडण्यात अपयश आले. सर्वप्रथम २००८ मध्ये कोठारी यांनी २०० कोटी रुपये घेतले. २०१० मध्ये त्यांनी ५२० कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच होती. सन २०११ मध्ये ५८५ कोटींचे नवीन कर्ज घेतले आहे. २०१२ मध्ये ५८५ कोटी आणि २०१३ मध्ये ५८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे कर्ज घेण्याची पद्धतही अजब होती. कधी रोटोमॅकने गहू खरेदीच्या नावावर तर कधी निर्यात ऑर्डर पूर्ण करण्याच्या नावाखाली कर्ज घेतले आणि कर्ज घेतलेले ते पैसे इतरत्र गुंतवले.

CBI च्या तपासात झाली पोलखोल
विक्रम कोठारी यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँकेसह ७ वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडून २९१९ कोटींचे कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम ३७ हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. विक्रम कोठारी यांना बँक ऑफ बडोदाकडून ४५६.६३ कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाकडून ७५४ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ७७१.०७ कोटी रुपये, युनायटेड बँक ऑफ इंडियाकडून  ४५८.९५ कोटी रुपये, अलाहाबाद बँकेकडून ३३०.६८ कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४९.४७  कोटी रुपये घेतले. विक्रम कोठारी यांनी ज्या व्यवसायात पैसे गुंतवले ते व्यवसाय ठप्प झाले. कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या.

विक्रम कोठारी परदेशात गेलेल्या वृत्तानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये विक्रमला पहिल्यांदा अटक केली होती. त्याला जवळपास दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. विक्रम कोठारी यांचे २०२२ मध्ये निधन झाले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोटोमॅक कंपनीचे अस्तित्व २०२० मध्ये संपुष्टात आले. कंपनीने रोटोमॅक ब्रँड नावाचा ३.५ कोटींना लिलाव केला. १२ कंपन्यांनी हे ब्रँड नेम विकत घेतले आणि त्याच कंपन्या या नावाने व्यवसाय करत आहेत.
 

Web Title: rotomac scam is worth rs 37000000000, vikram kothari took loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.