पणजी : उन्हाळा तापला की गोवेकरांना सुकवणे - वाळवणे सुचते. पावसाळा आता महिन्याभरावर आलेला आहे. असे असले तरी मे महिन्याच्या मध्यावर वर्दी देणाऱ्या सरी कोसळत असतात, नंतरही आकाश अभ्राच्छादित राहते. त्यामुळे या महिन्याचा पहिला पंधरवडा हा बेगमीचा पक्ष म्हणून गोव्यात ओळखला जातो.
असाही गोवेकर प्रपंचासाठी पावसाळ्यात लागणाºया वस्तूंच्या बेगमीत स्वत:ला गुंतवून घेऊ
लागला आहे. त्याच्यासाठी बेगमीच्या वस्तू बाजारात दाखल होऊ
लागल्या आहेत. मिरची, मसाला, आमसुल, कोकम, अळसांदे,
गावठी कांदा यांच्या दरांची चाचपणी सुरू झाली आहे. पावसाळ्यात
ज्याचे लोणचे सर्रास वापरले जाते तो करेल आंबा अजून तरी बाजारात जोमाने आलेला दिसत नसला तरी तुरळक फळे दिसू लागली आहेत. राज्यातील विविध बाजारपेठांत आता पुरुमेताचा बाजार भरू लागला आहे. खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी वाढू लागली आहे.
बेगमीच्या खरेदीत मडगाव, बाणस्तारी, म्हापसा, फोंडा, वास्को यांसह राज्यातील सर्व प्रमुख बाजारापेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठीही बेगमी अनिवार्य होऊन बसली आहे.
बेगमीची खरेदी जोरात; मिरच्या, अळसांदेला जास्त पसंती
उन्हाळा तापला की गोवेकरांना सुकवणे - वाळवणे सुचते. पावसाळा आता महिन्याभरावर आलेला आहे. असे असले तरी मे महिन्याच्या मध्यावर वर्दी देणाऱ्या सरी कोसळत असतात, नंतरही आकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:51 AM2018-05-02T01:51:39+5:302018-05-02T01:51:39+5:30