मुंबई, पुण्यासह आता ग्रामीण भागातील तरुणांमध्येही रॉयल एन्फिल्ड गाडीची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, या गाड्यांची मागणी वाढत आहे. मात्र, रॉयल एन्फिल्डची हौसेनं खरेदी करणाऱ्यांना शॉक देणारी बातमी आहे. कारण, जानेवारी महिन्यांपासून कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामध्ये, क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयीन मोटारसायकल या बुलेट गाड्यांचा समावेश आहे.
क्लासीक 350
वाढविण्यात आलेली किंमत - 2,872 रुपयांपासून ते 3,332 रुपये एंट्री लेवल, Redditch Classic 350 - 1.87 लाख (एक्स-शोरूम)टॉप मॉडेल, Chrome Classic 350- 2.18 लाख (एक्स-शोरूम)क्लासिक 350 रॉयल एनफील्ड सेगमेंटची सर्वाधिक संख्येनं विकणारी मोटारसायकल आहे. कंपनीने ही पॉप्युलॅरिटीला ध्यानात घेऊनच किंमतीत वाढ केली आहे. क्लासिक 350 रेंजच्या बाइक्सची किंमत वेरिएंटनुसार वाढविण्यात आली आहे.
रॉयल एन्फिल्ड Meteor 350
वाढविण्यात आलेली किंमत - फायरबॉल रेंज 2,511 रुपयेफायरबॉल रेंज- 2.01 लाख ते 2.03 लाख (एक्स-शोरुम) पर्यंतMeteor 350 ची स्टेलर रेंजवाढवलेल किंमत - 2601नवी किंमत - 2.07 लाख रुपये ते 2.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) Meteor 350 Supernova सर्वाधिक वाढ
वाढविण्यात आलेली किंमत - 2,752 रुपयेनवीन किंमत - 2.17 लाख से लेकर 2.19 लाख (एक्स-शोरूम) Meteor 350 लाइनअप चे Supernova मॉडेलवर सर्वाधिक वाढ झालीय, या सर्व वेरिएंटवर 2,752 रुपए वाढ झालीय.
रॉयल एनफील्ड हिमालयन
रॉयल एनफील्ड की हिमालयन रेंजमध्ये सर्वाधिक किंमत वाढल्याचे दिसून आले.
वाढलेली किंमत - 4,000 रुपयांपेक्षा जास्त नवीन किंमत - रॉयल एनफील्ड हिमालयन ग्रे आणि सिल्वर- 2.14 लाख (एक्स-शोरूम)रॉयल एनफील्ड हिमालयन ब्लॅक आणि ग्रीन- 2.22 लाख (एक्स-शोरूम)रॉयल एनफील्डच्या इन बाइक्स की किंमत पूर्वीएवढीच.