Join us

रॉयल एनफिल्डच्या ‘हिमालयन’ बाईकचे मोंढे मोटार्समध्ये अनावरण

By admin | Published: April 26, 2016 12:16 AM

सोलापूर :

सोलापूर :
रॉयल एनफिल्डच्या ‘हिमालयन’ या 410 सीसी मोटरसायकलीचे येथील मोंढे मोटार्समध्ये सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना विष्णू मोंढे म्हणाले की, ही 410 सीसी बाईक असून, दोन्ही डिस्क ब्रेक, ऑईल कुल्ड इंजिन, फ्रंट व्हायजर, रीयर मोनोलिक सस्पेंशनमुळे रायडिंग अत्यंत सुलभ आणि आरामदायी आहे. 400 ते 800 सीसीच्या सर्व वाहनांमधील सर्व सुविधा असलेली ही एकमेव बाईक आहे. कार्यक्रमात पवन मोंढे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोंढे मोटार्सचे किरण गुडूर, योगेश इराबत्ती, ओंकार फाळके, शिवानंद कोटे, युन्नूस शेख, शफी बिराजदार, किरण व्हसदोड्डी, प्रिया संगा, प्रसाद तोगटवीर आदींनी पर्शिम घेतले. (वा. प्र.)
रॉयल एनफिल्डच्या ‘हिमालयन’ या मोटरसायकलच्या अनावरणप्रसंगी सुधीर खरटमल, आनंद बनसोडे, विष्णू मोंढे, पवन मोंढे, विक्रम भोसले, दारुखानवाला, संतोष बायस आदी.

फॅशन वर्ल्डच्या फॅशन धमाकाला प्रतिसाद
सोलापूर : नवीपेठेतील फॅशन वर्ल्ड या शोरुमने सुरु केलेल्या फॅशन धमाका योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांनी धमाका पेटीतून एक क्वॉईन उचलायचा आहे. यामध्ये सात ते 100 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचे क्वॉईन्स आहेत. ग्राहकांनी उचललेल्या क्वॉईनमध्ये जेवढे टक्के डिस्काउंटचा आकडा असेल त्याच्या बिलाच्या रकमेवर तेवढय़ा टक्क्यांचे मोफत खरेदीचे व्हाऊचर देण्यात येत आहे. याद्वारे ग्राहकांना 28 एप्रिल ते 8 मे या कालावधीत मोफत खरेदीची संधी देण्यात येणार आहे. या योजनेला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे मनीष रांभिया यांनी सांगितले. (वा. प्र.)
फॅशन वर्ल्डच्या फॅशन धमाका योजनेत भाग्यवंत ठरलेले सरवदे ग्राहक.

लुईसमध्ये लग्नसराईनिमित्त नवा स्टॉक
सोलापूर : सरस्वती चौकातील लुईस फिलिप या रेडिमेड स्टोअरमध्ये खास लग्नसराईनिमित्त नवीन कपड्यांची मालिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्लेन, प्रिंटेडमध्ये तसेच शायनिंग कॉटनमध्ये फॉर्मल व कॅज्युअल शर्ट आहेत. तसेच फॉर्मल व कॉटनमध्ये सेल्फ चेक्स असलेले शायनिंगमध्ये ट्राऊझर्स उपलब्ध आहेत. तसेच नवीन फ्रेश स्टॉकमध्ये जिन्स, टी-शर्ट आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लुईसच्या वतीने करण्यात आले आहे. (वा.प्र.)