Lokmat Money > बिझनेस न्यूज > या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली कायमस्वरूपी घरून कामास परवानगी

या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली कायमस्वरूपी घरून कामास परवानगी

या कंपनीने आपल्या ७५ टक्के कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होमविषयी नवीन धोरण तयार केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:21 AM2020-09-04T05:21:16+5:302020-09-04T05:22:04+5:30

या कंपनीने आपल्या ७५ टक्के कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होमविषयी नवीन धोरण तयार केले आहे.

RPG Enterprises company allowed employees to work from home permanently | या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली कायमस्वरूपी घरून कामास परवानगी

या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली कायमस्वरूपी घरून कामास परवानगी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्यास परवानगी दिली आहे; पण भारतातील आरपीजी एंटरप्राइजेसने आपल्या सेल्स कर्मचाºयांना घरातून कायमस्वरूपी काम करण्याची परवानगी दिली आहे.
कर्मचाºयांसाठी असा निर्णय घेणारी आरपीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे. कंपनीने आपल्या ७५ टक्के कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होमविषयी नवीन धोरण तयार केले आहे. याअंतर्गत सेल्स कर्मचारी घरातून कायम काम करतील.

आणि अन्य विभागांतील कर्मचा-यांना ही तशी मुभा दिली जाण्याची शक्यता आहे.
या नव्या धोरणाची अंमल बजावणी १ सप्टेंबरपासून सुरू होईल. सध्या कंपनीचे सर्व कमर्चारी घरून काम करत आहेत. हे धोरण आरपीजीच्या ग्लोबल आॅपरेशन्सवर देखील लागू होईल. फॅक्टरी व प्लांटेशनमध्ये काम करत नसलेल्या कामगारांनाही हे धोरण लागू असेल.

जीवनमान सुधारेल

वर्क फ्रॉम होम पॉलिसीने काम करण्याची पारंपरिक धारणा मोडली आहे. जे कर्मचारी मशीनवर काम करीत नाहीत आणि ज्यांना तंत्रज्ञान व्यवसायात क्लायंटला भेटण्याची जबाबदारी नाही, ते कोरोना संकट संपल्यावरही कोठूनही काम करू शकतील, असे आरपीजी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी म्हटले आहे. काम करण्याचे नवीन मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि उत्पादकता वाढेल.

Web Title: RPG Enterprises company allowed employees to work from home permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.