नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्यास परवानगी दिली आहे; पण भारतातील आरपीजी एंटरप्राइजेसने आपल्या सेल्स कर्मचाºयांना घरातून कायमस्वरूपी काम करण्याची परवानगी दिली आहे.कर्मचाºयांसाठी असा निर्णय घेणारी आरपीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे. कंपनीने आपल्या ७५ टक्के कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होमविषयी नवीन धोरण तयार केले आहे. याअंतर्गत सेल्स कर्मचारी घरातून कायम काम करतील.आणि अन्य विभागांतील कर्मचा-यांना ही तशी मुभा दिली जाण्याची शक्यता आहे.या नव्या धोरणाची अंमल बजावणी १ सप्टेंबरपासून सुरू होईल. सध्या कंपनीचे सर्व कमर्चारी घरून काम करत आहेत. हे धोरण आरपीजीच्या ग्लोबल आॅपरेशन्सवर देखील लागू होईल. फॅक्टरी व प्लांटेशनमध्ये काम करत नसलेल्या कामगारांनाही हे धोरण लागू असेल.जीवनमान सुधारेलवर्क फ्रॉम होम पॉलिसीने काम करण्याची पारंपरिक धारणा मोडली आहे. जे कर्मचारी मशीनवर काम करीत नाहीत आणि ज्यांना तंत्रज्ञान व्यवसायात क्लायंटला भेटण्याची जबाबदारी नाही, ते कोरोना संकट संपल्यावरही कोठूनही काम करू शकतील, असे आरपीजी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी म्हटले आहे. काम करण्याचे नवीन मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि उत्पादकता वाढेल.
या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली कायमस्वरूपी घरून कामास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:21 AM