Join us

सोने १00 रुपयांनी; तर चांदी २५0 रुपयांनी स्वस्त

By admin | Published: February 07, 2015 2:53 AM

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्माते यांच्या मागणीत घट झाल्याने चांदीचा भावही २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये प्रतिकिलो राहिला.लग्नसराईच्या तोंडावर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांच्या मागणीत घट नोंदली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात ही घट दिसून आली.न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.३५ टक्क्यांनी घटून १,२६४.५० डॉलर प्रतिऔंस व चांदी ०.६३ टक्क्यांनी घटून १७.२२ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी घसरून अनुक्रमे २८,२०० रुपये व २८,००० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २४,००० रुपयांवर स्थिर होता. तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ४२५ रुपयांनी कमी होऊन ३८,१४० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ६३,००० रुपये, तर विक्रीसाठी ६४,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)