Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

प्रचंड कर्ज आणि विविध आव्हानं यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:38 AM2024-03-06T11:38:23+5:302024-03-06T11:38:41+5:30

प्रचंड कर्ज आणि विविध आव्हानं यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम दिसून येत आहे.

rs 110 share falls to rs 3 anil ambani Reliance Home Finance now takes upper circuit Investors rush to buy | ₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Reliance Home Finance share: अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत. प्रचंड कर्ज आणि विविध आव्हानं यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांनी शेअर्सवर मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना मोठं नुकसान झालंय. गुंतवणूकदारांचे नुकसान करणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स होम फायनान्सचं नावही सामील आहे. एकेकाळी या शेअरची किंमत 110 रुपये होती, जी आता आपटून 5 रुपयांपेक्षा कमी वर आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शेअरला सातत्यानं अपर सर्किट लागतंय.
 

शेअरची किंमत काय?
 

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, रिलायन्स होम फायनान्सच्या शेअर्सला 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. हा शेअर 3.21 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 3.37 रुपयांवर पोहोचला. सोमवारीही शेअरमध्ये अशीच वाढ झाली होती. जानेवारी महिन्यात हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6.22 रुपयांवर पोहोचला होता. सुमारे 7 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 110 रुपयांपर्यंत गेली होती. या तुलनेत हा स्टॉक 99 टक्क्यांनी घसरला आहे. 
 

कोण आहेत कंपनीचे प्रमोटर?
 

दिवाळखोरी प्रक्रियेमुळे, रिलायन्स होम फायनान्समधील प्रवर्तकांचा हिस्सा आता कमी झाला आहे. कंपनीचे प्रवर्तक अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. डिसेंबर तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांचा हिस्सा 0.74 टक्के आहे. सार्वजनिक भागीदारी 99.26 टक्के आहे. जून महिन्यात प्रवर्तकांची हिस्सा 43.61 टक्के होता, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग 56.39 टक्के होती. सध्या अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स होम फायनान्सचे 2,73,891 शेअर्स आहेत. तर त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्याकडे 2,63,474 शेअर्स आहेत. 
 

रिलायन्स होम फायनान्सवर ESM अर्थात अॅडव्हान्स्ड सर्व्हिलांस मेजर्स स्टेज 1 लागू आहे. हे सेबी किंवा स्टॉक एक्स्चेंजकडून लावलं जातं. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं हा आहे. सहसा शेअर्समधील प्रचंड अस्थिरता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातो.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: rs 110 share falls to rs 3 anil ambani Reliance Home Finance now takes upper circuit Investors rush to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.