Join us

Indigo च्या पॅरेंट कंपनीला ₹१६६६ कोटींची टॅक्स नोटीस, आता कायदेशीर लढाई लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:10 AM

कंपनीने या टॅक्स नोटीसला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.

इंडिगो एअरलाइन्सची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन (InterGlobe Aviation) विरुद्ध १६६६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची टॅक्स नोटीस जारी करण्यात आलीये. याबाबत कंपनीने या टॅक्स नोटीसला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. आयकर आयुक्त (अपील) यांनी इंटरग्लोब एव्हिएशन विरुद्ध असेसमेंट इयर २०१६-१७ आणि २०१७-१८ च्या कर मागणीशी संबंधित आदेश पारित केले आहेत. कंपनीनं शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. असेसटमेंट ऑफिसरनं असेसमेंट इयर २०१६-१७ साठी ७३९.६८ कोटी रुपये आणि असेसमेंट इयर २०१७-१८ साठी ९२७.०३ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कंपनीनं याविरोधात आयकर आयुक्त (अपील) यांच्याकडे अपील केलंय.या रकमेत व्याज आणि दंडाचा समावेश नाही. आयकर आयुक्त (अपील) यांनी हे आदेश दिले आहेत. इंटरग्लोब एव्हिएशननं दिलेल्या माहितीनुसार, एअरक्राफ्ट आणि इंजिनच्या खरेदीसह उत्पादकांकडूनकंपनीला मिळालेल्या काही इन्सेन्टिव्हसवर टॅक्स ट्रिटमेंटमुळे करपात्र उत्पादनात सुधारणा आणि काही खर्च मान्य करण्यात आले नव्हते. वैयक्तिक सुनावणीची संधी न देता आणि गुणवत्तेवर केसचा विचार न करता हे सर्व केल्याचं सांगण्यात आलं आहे.कंपनी योग्य कायदेशीर पावले उचलून या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, वकिलांच्या कायदेशीर सल्ल्याच्या आधारे अथॉरिटीद्वारे घेण्यात आलेले निर्णय टिकणारे नसतात, असंही इंटरग्लोब एव्हिएशननं म्हटलंय.

टॅग्स :इंडिगोइन्कम टॅक्स