Join us

‘एसआयपी’त गुंतविले २ लाख कोटी; दोन्ही महिन्यांत १९ हजार कोटींपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 5:39 AM

विशेष म्हणजे यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत म्युच्युअल फंड गुंतवणूक १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिली

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे आकर्षण देशात वाढत चालले असून वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडात होणारी गुंतवणूक २८ टक्क्यांनी वाढली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

विशेष म्हणजे यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत म्युच्युअल फंड गुंतवणूक १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिली. म्युच्युअल फंडात लोक शिस्तीत गुंतवणूक करीत आहेत, हे यावरून दिसून येते. याशिवाय म्युच्युअल फंडावर लोकांचा विश्वास वाढला असल्याचेही यातून दिसते. अनेक जण गुंतवणुकीचा खात्रीलायक पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहू लागले आहेत. 

७ वर्षांत ४ पट वाढ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (एएमएफआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील ७ वर्षांत एसआयपी गुंतवणूक ४ पट वाढली आहे. वित्त वर्ष २०१६-१७ मध्ये एसआयपी गुंतवणूक अवघी ४३,९२१ कोटी रुपये होती. यंदा एकट्या मार्चमध्ये १९,२७० कोटी रुपयांची एसआयपी गुंतवणूक झाली. मार्च २०२३ मध्ये हा आकडा १४,२७६ कोटी रुपये होता.

म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक कितीवर्ष     गुंतवणूक रुपयांमध्ये२०२३-२४    २ लाख कोटी  २०२२-२३    १.५६ लाख कोटी २०२१-२२    १.२४ लाख कोटी २०२०-२१    ९६,०८० कोटी  

टॅग्स :गुंतवणूक