नवी दिल्ली : इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या पूर्णपणे गाळात गेलेल्या कंपनीत व तिच्या उपकंपन्यांत देशातील नोकरदारांचे भविष्य निर्वाह निधीतील १५ ते २0 हजार कोटी रुपये अडकले आहेत. कर्मचाऱ्यांच्या हक्काची ही रक्कम बुडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'आयएल अँड एफएस' कंपनीवर तब्बल ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, या कंपनीला आपले अनेक प्रकल्प त्यामुळे एकतर थांबवावे लागले आहेत वा ते अन्य कंपन्यांना द्यावे लागले आहे. कंपनीवर असलेल्या ९१ हजार कोटींच्या कर्जापैकी बँकांंकडून घेतलेले कर्जच आहे ६१ टक्के. याशिवाय कंपनीने ३३ टक्के कर्ज उभारले होते. या कंपनीला कर्ज देणाºयांचे ११,३०० कोटी ते २८,५०० कोटी रुपये बुडण्याची शक्यता यूबीएन अॅनालिटीक्सने वर्तवली आहे.
आयएल अँड एफएस कंपनीच्या ट्रिपल ए मानांकनामुळे अनेक अर्थविषयक सल्लागार व तज्ज्ञांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला संस्था, कंपन्या यांनाच नव्हे, तर सरकारलाही दिला होता. त्यामुळे कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीतील १५ ते २0 हजार कोटी रुपये या कंपनीत गुंतवण्यात आले. याखेरीज सरकारचीही मोठी रक्कम या कंपनीत अडकली आहे.सर्वाधिक पैसा बँकांतयेस बँक, बँक आॅफ बडोदा, इंडसइंड बँक तसेच पंजाब नॅशनल बँक यांचे या कंपनीत सर्वाधिक पैसे आहेत. प्रॉव्हिडंट व पेन्शनची रक्कमसुमारे १५ ते २0 हजार कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे. या कंपनीचे ४0 टक्के बाँड पीएफकडे होते, असे सांगण्यात येते. मात्र ही रक्कम नेमकी किती आहे, हे स्पष्ट झालेले नाही.