Join us  

२००० च्या नोटां संदर्भात मोठी अपडेट! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 4:24 PM

मागील काही दिवसापासून २ हजार रुपयांच्या नोटांवरुन चर्चा सुरू आहेत, देशातील बँकांना एटीएममध्ये न भरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मागील काही दिवसापासून २ हजार रुपयांच्या नोटांवरुन चर्चा सुरू आहेत, देशातील बँकांना एटीएममध्ये न भरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर आता संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खुलासा केला आहे. एटीएम मशिनमध्ये २,००० रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले.  

किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये ठेवायच्या हे बँका स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१७ अखेर आणि मार्च २०२२ अखेरीस ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ९.५१२ लाख कोटी रुपये आणि २७.०५७ लाख कोटी रुपये होते. 

बिस्लेरीच्या अधिग्रहणाला ‘टाटा’, आता जयंती चौहानच सांभाळणार व्यवसाय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.एटीएममध्ये २,००० रुपयांच्या नोटा न भरण्यासाठी बँकांना कोणतीही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली नाही. बँका एटीएममधील रकमेचे मूल्यांकन करतात आणि मागील वापराच्या आधारावर कोणत्या नोटांची जास्त गरज आहे.

३१ मार्च २०२३ पर्यंत केंद्र सरकारच्या कर्ज/उत्तरदायित्वांची एकूण रक्कम सुमारे १५५.८ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यापैकी, सध्याच्या विनिमय दरांवर अंदाजे बाह्य कर्ज ७.०३ लाख कोटी रुपये आहे.

टॅग्स :निर्मला सीतारामनभाजपाभारतीय रिझर्व्ह बँकएटीएम