Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

या गेमिंग कंपनीचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:20 PM2023-10-16T15:20:50+5:302023-10-16T15:21:03+5:30

या गेमिंग कंपनीचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

rs 23000 crore GST notice investors fear Investors sell shares Delta Corp shares bse nse | ₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गेमिंग कंपनी डेल्टा कॉर्पचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. जुलैच्या मध्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सातत्यानं घसरण होत आहे. कंपनी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. प्रथम, सरकारनं ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो इत्यादींवरील जीएसटी वाढवून 28 टक्के केलाय. आता कंपनीला 23,200 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. या दोन्ही बातम्यांनी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

शेअर बाजारात कंपनीची स्थिती खराब
सोमवारी, डेल्टा कॉर्पचे शेअर्स बीएसईमध्ये 132.40 रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र 12 टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर कंपनीचे शेअर्स 124.60 रुपयांच्या पातळीवर आले. ही कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. जेव्हा डेल्टा कॉर्पला पहिल्यांदा जीएसटीची नोटीस मिळाली तेव्हा कंपनीचे शेअर्स 180 रुपयांच्या जवळपास ट्रेंड करत होते. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

जवळपास ६ पट टॅक्स
सध्या कंपनीचं मूल्यांकन 4 हजार कोटी रुपये आहे आणि कंपनीला मूल्यांकनाच्या  जवळपास 6 पट टॅक्स भरायचा आहे.
डेल्टा कॉर्पनं 22 सप्टेंबरला 4 निरनिराळ्या टॅक्स नोटीसची माहिती दिली होती. डेल्टा कॉर्पला जुलै 2017 चे मार्च 2022 साठी 11,134 कोटी रुपये, Casino Deltin Denzong ला 628.2 कोटी रुपयांची नोटीस, Highstreet Cruises ला 3289.94 कोटी रुपयांची नोटीस आणि Delta Pleasure Cruise ला 1765.21 कोटी रुपयांची नोटीस मिळाली होती. यानंतर 14 ऑक्टोबर रोजी कंपनीनं एकदा 2 सब्सिडायरी कंपन्यांना नोटीस मिळाल्याची माहिती दिली होती.

Web Title: rs 23000 crore GST notice investors fear Investors sell shares Delta Corp shares bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.