Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिलिंडर दरांत २५ रुपयांनी वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत्याच; महागाईचा आणखी भडका उडणार  

सिलिंडर दरांत २५ रुपयांनी वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत्याच; महागाईचा आणखी भडका उडणार  

Gas cylinder price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सहन करत असलेल्या सर्वसामान्यांचे अर्थचक्र अधिकच मेटाकुटीला येण्याची चिन्हे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 08:18 AM2021-02-05T08:18:05+5:302021-02-05T08:21:17+5:30

Gas cylinder price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सहन करत असलेल्या सर्वसामान्यांचे अर्थचक्र अधिकच मेटाकुटीला येण्याची चिन्हे आहेत.

Rs 25 increase in cylinder price as petrol-diesel prices go up; Inflation will rise further | सिलिंडर दरांत २५ रुपयांनी वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत्याच; महागाईचा आणखी भडका उडणार  

सिलिंडर दरांत २५ रुपयांनी वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत्याच; महागाईचा आणखी भडका उडणार  

नवी दिल्ली -  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सहन करत असलेल्या सर्वसामान्यांचे अर्थचक्र अधिकच मेटाकुटीला येण्याची चिन्हे आहेत. इंधन दरांपाठोपाठ आता सिलिंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ  करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. 
केंद्रीय अर्थसंकल्प सादर  होऊन जेमतेम चार दिवस होत  नाहीत तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ३५ पैशांची वाढ झाल्याची नोंद आहे. तर १४ किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरांत २५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.  पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील वाढीची झळ सर्वसामान्यांना  पोहोचत आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत अचानक वाढ  झाली आहे. गेल्या तीन दिवसांत क्रूड तेलाची किंमत ५९ डॉलर प्रति  बॅरल एवढी झाली आहे. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी केल्याने ही  दरवाढ झाली आहे. इंधनाची अंतिम किंमत ही केंद्राचे आणि राज्यांचे उत्पादन शुल्क व मूल्यवर्धित कर यांच्या एकत्रित बेरजेवरून ठरते. या किमतींचा भार ग्राहकांवर पडत आहे.  
- मुकेशकुमार सुराणा, अध्यक्ष, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.

डिझेलच्या दरवाढीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. 
या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा सिंचन खर्च वाढेल, तसेच वाहतूक भाडेही वाढेल. त्यातून जीवनावश्यक वस्तू महाग होतील, असे जाणकारांचे मत आहे.

सिलिंडरच्या किमती
मुंबई : ७१० रुपये 
नवी दिल्ली : ७१९ रुपये
कोलकाता : ७४५ रुपये
चेन्नई : ७३५ रुपये
पेट्रोलच्या किमती (प्रतिलिटर)
मुंबई : ९३.२० रुपये
नवी दिल्ली : ८६.६५ रुपये
कोलकाता : ८८.०१ रुपये
चेन्नई : ८९.१३ रुपये
डिझेलच्या किमती (प्रतिलिटर)
मुंबई : ८३.६७ रुपये
नवी दिल्ली : ७६.८३ रुपये
कोलकाता : ८०.४१ रुपये
चेन्नई : ८२.०४ रुपये

Web Title: Rs 25 increase in cylinder price as petrol-diesel prices go up; Inflation will rise further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.