उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ शुक्रवारी बंद झाला. या आयपीओला (IPO) बंपर प्रतिसाद मिळाला आहे. वास्तविक, पहिल्याच दिवसापासून या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये विशेष क्रेझ होती, जी शेवटच्या दिवसापर्यंत कायम होती. या आयपीओद्वारे सुमारे 11.09 कोटी शेअर्स ऑफर केले जात आहेत, तर 1228 कोटी शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ तिसऱ्या दिवशी तब्बल 110 पट सबस्क्राइब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्सचा (QIB) हिस्सा 135.71 पट सबस्क्राईब झाला, तर नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 88.74 पट सबस्क्राईब झाला. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे 78 पट सबस्क्राईब झालाय.
बॅलन्सशीट उत्तमउत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 12 जुलै ते 14 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. दरम्यान, दीर्घ कालावधीनंतर एका बँकेचा आयपीओ उघडला. बँकेच्या व्यवसायाची व्याप्ती जरी कमी असली तरी बँकेची बँलन्सशीट मात्र मजबूत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या बँकेच्या आयपीओमध्ये अधिक रस दाखवला.
19 जुलैला लिस्टिंगया IPO ची किंमत 23-25 रुपये निश्चित करण्यात आली होती. एका लॉटमध्ये 600 शेअर्स आहेत, एका लॉटसाठी गुंतवणूकीची रक्कम 15 हजार रुपये आहे. दरम्यान, शेअर्सचं अलॉटमेंट 19 जुलै रोजी होणार आहे. बीएसई आणि एनएसईवर स्टॉक लिस्टिंगची तारीख 24 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)