Join us

३00 रुपयांचा एलईडी मिळणार ४४ रुपयांत

By admin | Published: September 14, 2015 1:01 AM

विजेचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने घरगुती दक्ष लायटिंग कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकार ३00 रुपयांचा बल्ब ४४ रुपयांना विकणार आहे

नवी दिल्ली : विजेचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने घरगुती दक्ष लायटिंग कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकार ३00 रुपयांचा बल्ब ४४ रुपयांना विकणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल हे अलीकडेच असोचेमच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. गोयल म्हणाले की, सरकार स्पर्धात्मक बोलींच्या माध्यमातून ठोक स्वरूपात खरेदी करून बल्बची किंमत ४४ रुपयांवर आणण्याचा विचार करीत आहे. या योजनेअंतर्गत खरेदी केलेले बल्ब सरकार ग्राहकांना कमीत कमी किमतीत विकते. सध्या एलईडी बल्बची बाजारातील किंमत २७५ ते ३00 रुपये आहे. स्पर्धात्मक बोलीच्या माध्यमातून बल्ब खरेदीला अपेक्षेपेक्षाही चांगले यश मिळत आहे. आधी सरकारने ९९ रुपयांना एक बल्ब खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. तथापि, प्रत्यक्ष बोलीत सरकारला अवघ्या ७४ रुपयांतच बल्ब मिळाला. या योजनेद्वारे ग्राहक एलईडी बल्बचे पैसे हप्त्यानेसुद्धा भरू शकतात.९० टक्क्यांपर्यंत बचत शक्यअधिकृतरीत्या करण्यात आलेल्या अभ्यासानुसार घरगुती, तसेच सार्वजनिक ठिकाणी नेहमीच्या बल्बऐवजी एलईडी बल्ब वापरल्यास ५0 ते ९0 टक्क्यांपर्यंत वीज बचत होऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)