कोट्यवधींची संपत्ती, ४०० खोल्यांचं घर असं सर्वकाही असेल तर त्याला कामाची गरज काय असा तुमच्य मनात प्रश्न आला असेल. ग्वाल्हेरच्या राजघरण्यात जन्म झाला असला तरी महाआर्यमन शिंदे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आता व्यावसायिक जगात प्रवेश केलाय. त्यांचे वडील म्हणजे राजकारणातील मोठं नाव आणि विद्यमान सरकारमधील केंद्रीय मंत्री आहेत. असं असलं तरी महाआर्यमान यांनी आपल्या मित्रासोबत आपली कंपनी सुरू केली आहे. वडिलांना राजकारणात मदत करण्यासोबतच ते व्यवसायातही हळूहळू आपले पाय रोवत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी आपलं नवीन स्टार्टअप सुरू केलाय.
कोण आहेत महाआर्यमन?
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे सुपुत्र महाआर्यमन शिंदे यांनी २०२२ मध्ये MYमंडी नावाचं स्टार्टअप सुरू केलं. ते या स्टार्टअपचे फाऊंडर आहेत. अब्जावधींची संपत्ती असूनही त्यांनी आपल्या हिंमतीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी मित्र सूर्यांश राणा यांच्यासोबत कृषी स्टार्टअप MYमंडीची सुरूवात केली. सध्या त्यांच्या त्यांच्या स्टार्टअपनं १ कोटींचा महसूल पार केला आहे.
फळ-भाज्यांशी निगडीत व्यवसाय
महाआर्यमन शिंदे यांची कंपनी MYमंडी ताजी फळं आणि भाज्यांशी निगडीत स्टार्टअप चालवते. त्यांची कंपनी एक ऑनलाइन अॅग्रीगेटर म्हणून फळ आणि भाज्या सप्लाय करण्याचं काम करतात. ते मोठ्या प्रमाणात फळ आणि भाज्यांची खरेदी करतात आणि ते विक्रेत्यांना विकतात. माय मंडी ताज्या भाज्या आणि फळं पूश कार्टर कम्युनिटीला उपलब्ध करून देत शेतकरी आणि लोकांना जोडण्याचं काम करते.
पहिल्याच वर्षी कमाल
सध्या ही कंपनी जयपूर, ग्वाल्हेर, नागपूर आणि आग्रा या चार ठिकाणी आपली सेवा देत आहे. हळूहळू अन्य शहरांमध्ये याचा विस्तार करण्याचा विचार आहे. एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत कंपनीचा रेव्हेन्यू १ कोटी रुपये प्रति महिन्यापर्यंत पोहोचलाय.
'१५० कोटींची कंपनी बनवायचीये'
आपण आपला व्यवसाय अधिक मोठा करण्याचे प्रयत्न करत आहोत अशी माहिती महार्यमान यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिली. आम्ही गुंतवणूकदारांकडून ८ कोटी रुपये जमा करण्याच्या योजनेवर काम करत आहोत. यासाठी आम्ही कंपनीचं मूल्यांकन १५० कोटी रुपये ठरवलं आहे. गुंतवणूकीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर डेटा जमवणं, तंत्रज्ञान वाढवून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
४०० खोल्यांचा महाल
महाआर्यमन ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुपुत्र आहेत. २७ वर्षीय महाआर्यमन हे ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेसमध्ये राहतात. त्या ठिकाणी ४०० पेक्षा अधिक खोल्या आहेत. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गेल युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केलं. त्यांच्याकडे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि सॉफ्टबँकसारख्या मोठ्या संस्थांमधील कामाचाही अनुभव आहे.
वडिलांसोबत प्रचार
१३ व्या वर्षापासूनच महाआर्यमन शिंदे आपल्या वडिलांसोबत निवडणुकीच्या प्रचाराला जात होते. त्यांची भाषण करण्याची शैलीही त्यांच्या वडिलांप्रमाणेच आहे. मध्यप्रदेशात त्यांना युवराज म्हणून बोलावतात. याशिवाय ते सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. अनेकदा ते आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
किती आहे संपत्ती?
महाआर्यमन यांच्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ३७९ कोटी रुपये आहे.