Join us  

Rs 5 Old Note: ५ रुपयांची जुनी नोट आहे का? मग होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 7:15 PM

पाच रुपयांची एक नोट तुम्हाला लखपती बनवू शकते. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे १०० टक्के खरं आहे.

पाच रुपयांची एक नोट तुम्हाला लखपती बनवू शकते. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे १०० टक्के खरं आहे. जुन्या नोटा आणि नाण्यांसह अशा अनेक मौल्यवान वस्तू आहेत ज्यासाठी ऑनलाइन लिलाव केले जातात. या लिलावात काही रुपयांच्या नोटा किंवा नाणी तुम्हाला लखपती ते अगदी कोट्यधीशही बनवू शकतात. काही लोकांना जुन्या नोटा आणि नाणी सोबत ठेवण्याची आवड असते. आपला छंद जोपासण्यासाठी एक-दोन-पाच रुपयांच्या मोबदल्यात तुम्हाला हजारो रुपये देण्याची तयारी ठेवतात. जुन्या ५०० रुपयांच्या नोटेबाबतही हीच स्थिती आहे. म्हणजे जुन्या नोटा ज्या सध्या चलनात नाही किंवा ज्या दुर्मिळ आहेत अशी नोट तुमच्याकडे असेल तर तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. जर तुमच्याकडे ५ रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही १ लाख रुपये सहज कमवू शकता.

पाच रुपयांच्या या नोटेसाठी एक अट आहे. नोट तीच असावी ज्यावर शेतकरी ट्रॅक्टरने शेत नांगरत असल्याचं चित्र आहे आणि ज्या नोटेवर क्रमांक 786 छापलेला असेल. जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर तुम्ही ऑनलाइन एक्सचेंजमध्ये १ लाख रुपये कमावू शकता. या प्रकारच्या ऑनलाइन एक्सचेंजचा व्यवसाय इंटरनेटवर चांगला चालतो. तुम्हाला येथे अर्ज करावा लागेल आणि फोटोसह तुमच्याकडे असलेल्या नोटेची माहिती द्यावी लागेल. या प्रकारच्या देवाणघेवाणीचा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू आहे, ज्याद्वारे लोक भरपूर कमाई करतात.

या कंपन्या जुन्या नोटा खरेदी करतातजुन्या नोटांच्या बदल्यात शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्ससारख्या कंपन्यांची नावे आहेत, ज्या दुर्मिळ नोटांसाठी हजारो रुपये देतात. अशा कंपन्या तुम्हाला 5 रुपयांच्या नोटेऐवजी 30,000 ते 2 लाख रुपये देऊ शकतात. अशीच एक वेबसाइट coinbazaar.com आहे जिथे तुम्ही जुन्या नोटा विकून चांगली कमाई करू शकता. अशा वेबसाइट जुन्या नोटांसाठी ऑनलाइन लिलाव चालवतात जिथे विक्रेते आणि खरेदीदार नोटांची विक्री आणि खरेदी करण्याचे काम करतात.

ShopClues वेबसाइटवर गेल्यास तुम्हाला 10 रुपयांची पहिली छापील नोट विक्रीसाठी दिसेल. ही नोट विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे ज्यासाठी तुम्हाला 44,999 रुपये मोजावे लागतील. याआधी त्याची किंमत 49,999 रुपये होती पण सवलतीनंतर ही नोट 44,999 रुपयांना विकली जात आहे. त्याचप्रमाणे तुम्ही banknotecoinstamp.com वर गेल्यास 2 रुपयांची पहिली छापील नोट 6800 रुपयांना विकली जात आहे. वास्तविक ऑनलाइन कंपन्या आधी जुन्या नोटा खरेदी करतात, नंतर त्यांच्या ऑनलाइन साइटवर विकतात. कोणताही ग्राहक वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पेमेंट करून अशा दुर्मिळ नोटा खरेदी करू शकतो. तुमच्याकडे जुनी नोट असेल तर ती विकण्याची पद्धत वेगळी असते.

टॅग्स :व्यवसायजरा हटके