Swiggy-Zomato: देशातील आघाडीचे फूड डिलिव्हरी अॅप Swiggy-Zomato च्या अडचणीत काही संपत नाही आहेत. अलीकडेच स्विगी-झोमॅटोला 500 कोटी रुपयांची GST नोटीस मिळाली आहे. Swiggy-Zomato ग्राहकांकडून डिलिव्हरी फीच्या नावावर काही पैसे घेते. या पैशांबाबत कर अधिकारी आणि फूड डिलिव्हरी अॅप यांच्यात अनेकदा तणाव निर्माण होतो. या डिलिव्हरी फीच्या बाबतीत जवळपास 1000 कोटी रुपयांचा मुद्दा समोर आला आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजावून घेऊया…
फूड अॅग्रीगेटर्स झोमॅटो आणि स्विगी म्हणतात की, 'डिलिव्हरी चार्ज' हे दुसरं काहीही नसून घरोघरी अन्न पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी पार्टनरद्वारे केलेला खर्च आहे. कंपन्या ग्राहकांकडून तो खर्च वसूल करते आणि डिलिव्हरी पार्टनर्सना देते. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर अधिकारी हे मान्य करत नाही आहेतत.या प्रकरणात सुमारे 1000 कोटी रुपये पणाला लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटो आणि स्विगीला जीएसटी अधिकाऱ्यांकडून 500-500 कोटी रुपयांच्या नोटिसा मिळाल्या आहेत. कर अधिकार्यांना असे वाटते की स्विगी आणि झोमॅटो या वितरण शुल्कातून महसूल मिळवतात. अद्याप या प्रकरणावर झोमॅटो अथवा स्विगीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.