LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आहे. एलपीजी सिलिंडर दुर्घटना झाल्यास, यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते. ही भरपाई तेल विपणन कंपन्या (OMCs) देतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यासंदर्भात लोकसभेत सविस्तर माहिती दिली आहे.
कुणा किती कव्हर -तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी उपभोक्त्यांना विमा कव्हर मिळाले आहे. एलपीजी सिलिंडरच्या आगीमुळे मृत्यू झाल्यास, प्रति व्यक्ती 6 लाख रुपयांचे व्यैयक्तीक अपघात कव्हर आहे. प्रति व्यक्ति कमाल 2 लाख रुपयांसह प्रति घटनेसाठी 30 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो. याच प्रकारे, प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास प्रति घटना कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते.
विम्यासाठी काय करावे लागते? - ग्राहकाच्या परिसरात कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास, त्या ग्राहकाला संबंधित तेल विपणन कंपनीच्या वितरकाला कळवावे लागते. यानंतर, वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती दिली जाईल. यावर, तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देते. यानंतर, संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदींनुसार दाव्याच्या निपटाऱ्यासाठी निर्णय घेते.
एलपीजी सिलिंडरची किंमत काय? - स्वयंपाकाच्या LPG सिलिंडरची किंमत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 903 रुपये एवढी आहे. तर, उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना हे सिलिंडर 603 रुपयांना मिळते. महत्वाचे म्हणजे, या योजनेतील लाभार्थ्यांना 300 रुपयांची अतिरिक्त सब्सिडीही मिळते.