Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६० हजार कोटींचा फटका, आज दुसरा दिवस

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६० हजार कोटींचा फटका, आज दुसरा दिवस

सरकारी बँकांमधील कर्मचारी-अधिकाºयांचा दोन दिवसीय देशव्यापी संप बुधवारी सुरू झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:28 AM2018-05-31T05:28:07+5:302018-05-31T05:28:43+5:30

सरकारी बँकांमधील कर्मचारी-अधिकाºयांचा दोन दिवसीय देशव्यापी संप बुधवारी सुरू झाला

Rs 60,000 cr hit by bank employees' strike | बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६० हजार कोटींचा फटका, आज दुसरा दिवस

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६० हजार कोटींचा फटका, आज दुसरा दिवस

मुंबई : सरकारी बँकांमधील कर्मचारी-अधिकाºयांचा दोन दिवसीय देशव्यापी संप बुधवारी सुरू झाला. बँकांच्या क्लिअरिंग हाऊसमधील कर्मचारी संपात असल्याने ६० हजार कोटी रुपयांचे धनादेश संपाच्या पहिल्या दिवशी वटू शकले नाहीत. बँकांचे कामकाज ठप्प झाले.
बँक व्यवस्थापनाकडून केलेल्या केवळ २ टक्के पगारवाढीचा निषेधार्थ कर्मचाºयांच्या नऊ युनियनने हा संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी राज्यभरातील १२ हजार शाखांमधील ३६ हजार कर्मचारी व १० हजार अधिकारी संपावर गेले. याचा धनादेशांना फटका बसला. सीटीएस प्रणालीमुळे सर्व बँकांचे धनादेश मुंबईतील क्लिअरिंग हाऊसद्वारे वटवले जातात. आज ते वटले नाहीत.
संपामुळे राज्यातील १९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी व ७ लाख पेन्शनर्सचे ३१ मे रोजी होणारे वेतन रखडले. राज्यातील केंद्र सरकारी कर्मचारी, अधिकारी, पेन्शनर्सचे वेतन महिन्याच्या अखेरच्या दिवशी बँकेत जमा होते. संपामुळे हे वेतन १ तारखेला जमा होईल. संपाच्या पहिल्या दिवशी देशभर कर्मचाºयांनी क्षेत्रीय कार्यालयांसमोर निर्दशने केली. बँक कर्मचारी व अधिकाºयांच्या मेहनतीमुळे सर्वच बँकांना १.५८ लाख कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. पण कर्जबुडव्यांसाठीच्या १.७० लाख कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे बँकांना ५४ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. याचा निषेधही या संपाद्वारे केला जात असल्याचे आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) महाराष्टÑ सरचिटणीस देविदास तुळजापुरकर यांनी सांगितले.

संघाचाही सरकारविरुद्ध ‘एल्गार’ : या संपात संघ परिवारातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न एनओबीडब्ल्यू व नोबो या संघटनाही सहभागी झाल्या आहेत. एकूण संपकºयांंपैकी सुमारे १० टक्के कर्मचारी-अधिकारी या संघटनेचे आहेत. त्यांचा सरकारविरुद्धच्या या संपात सहभाग आहे, हे विशेष.

संप असला तरी राज्य सरकारी कर्मचाºयांचे वेतन ‘सेफ’ आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाºयांचे वेतन अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतला होता. अ‍ॅक्सिस बँक
खासगी असल्याने त्यांचे कर्मचारी संपावर नाहीत. त्यामुळे या कर्मचाºयांचे वेतन गुरूवार
नियमित होईल.

Web Title: Rs 60,000 cr hit by bank employees' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.