Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:23 AM2018-12-22T05:23:21+5:302018-12-22T05:23:39+5:30

आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले.

 Rs 83 thousand crore capital infusion given to public sector banks | सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले. यानंतर चालू वित्त वर्षात बँकांना मिळणाऱ्या भांडवलाचा आकडा १.०६ लाख कोटी होईल.
गुरुवारी संसदेत सादर झालेल्या ८६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांनंतर ही घोषणा झाली. पुरवणी मागण्यांतील ४१ हजार कोटी सरकारी बँकांना दिले जाणार आहेत. चालू वित्त वर्षात सरकारने या बँकांना २३ हजार कोटी रुपये यापूर्वीच दिले आहेत. सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतील ८६ हजार कोटी रुपयांत रोख व्यय (कॅश आऊटगो) केवळ १५ हजार कोटी रुपयांचा आहे.

Web Title:  Rs 83 thousand crore capital infusion given to public sector banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.