Join us

सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:23 AM

आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले.

नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले. यानंतर चालू वित्त वर्षात बँकांना मिळणाऱ्या भांडवलाचा आकडा १.०६ लाख कोटी होईल.गुरुवारी संसदेत सादर झालेल्या ८६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांनंतर ही घोषणा झाली. पुरवणी मागण्यांतील ४१ हजार कोटी सरकारी बँकांना दिले जाणार आहेत. चालू वित्त वर्षात सरकारने या बँकांना २३ हजार कोटी रुपये यापूर्वीच दिले आहेत. सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतील ८६ हजार कोटी रुपयांत रोख व्यय (कॅश आऊटगो) केवळ १५ हजार कोटी रुपयांचा आहे.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र