शेअर बाजारात टेक्सटाइल सेक्टरशी संबंधित कंपनी 'गुजरात हाय-स्पिन लिमिटेड'च्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी आली आहे. हा शेअर आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी 9.60 रुपयांच्या मागील किंमतीच्या तुलनेत 18.75% ने वधारला आहे. या शेअरची किंमत ट्रेडिंगदरम्यान 11.40 रुपयांवर पोहोचली होती. हा शेअर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 15.80 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकही आहे.
काय आहे शेअरहोल्डिंग पॅटर्न -गुजरात हाय-स्पिन लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, 64.92 टक्के वाटा प्रमोटर्सकडे आहे. तर 35.08 टक्के हिस्सेदारी पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे. यात प्रमोटर मगनलाल शंभुभाई परवडिया यांच्याकडे 35,37,190 शेअर आहेत. जे 21.12 टक्क्यांच्या वाट्या बरोबर आहे. तसेच, चंदूलाल शंभुभाई परवडिया यांच्याकडे 12,43,470 एवढे शेअर आहेत. जे 7.42 टक्यांच्या हिस्सेदारी एवढे आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून अशी आहे शेअरची स्थिती -गुजरात हाय-स्पिन लिमिटेडच्या रिटर्न पॅटर्नचा विचार करता, या शेअरने बीएसईच्या तुलनेत एक अथवा दोन वर्षांच्या कालावधीत कोणतेही आश्चर्यकारक परतावा दिलेला नाही. दोन वर्षांच्या कालावधीत BSE सेन्सेक्सच्या तुलनेत या शेअरने केवळ 20 टक्के एवढाच परतावा दिला आहे. मात्र, एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर केवळ 2 टक्के राहिला आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून हा शेअर डबल डिजिट परतावा देत आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)