Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹६१,८९५! सोन्याचा उच्चांक, ऐन लग्नसराईत ४ मे चा विक्रम मोडला, चांदीही ४ हजार रुपयांनी महागली

₹६१,८९५! सोन्याचा उच्चांक, ऐन लग्नसराईत ४ मे चा विक्रम मोडला, चांदीही ४ हजार रुपयांनी महागली

Gold-Silver Price: मंगळवारी सोन्याचा भाव ४५८ रुपयांनी वाढून ६१,८९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा सोन्याचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. सोन्याचा याआधीचा उच्चांकी भाव ४ मे रोजी ६१,६४६ रुपये इतका होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:16 AM2023-11-29T10:16:38+5:302023-11-29T10:21:55+5:30

Gold-Silver Price: मंगळवारी सोन्याचा भाव ४५८ रुपयांनी वाढून ६१,८९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा सोन्याचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. सोन्याचा याआधीचा उच्चांकी भाव ४ मे रोजी ६१,६४६ रुपये इतका होता.

₹61,895! Gold's high, broke the record of May 4 in Ain Lagnasarai, silver also went up by Rs 4,000 | ₹६१,८९५! सोन्याचा उच्चांक, ऐन लग्नसराईत ४ मे चा विक्रम मोडला, चांदीही ४ हजार रुपयांनी महागली

₹६१,८९५! सोन्याचा उच्चांक, ऐन लग्नसराईत ४ मे चा विक्रम मोडला, चांदीही ४ हजार रुपयांनी महागली

नवी दिल्ली - मंगळवारी सोन्याचा भाव ४५८ रुपयांनी वाढून ६१,८९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा सोन्याचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. सोन्याचा याआधीचा उच्चांकी भाव ४ मे रोजी ६१,६४६ रुपये इतका होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली.  

एचडीएफसी सिक्योरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. यंदा सोन्याचा भाव ६७ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतका होऊ शकतो.

सध्या देशभर लग्नसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना जादा किंमत मोजावी लागेल, असे सध्याच्या परिस्थितीनुसार दिसून येत आहे. लग्नसराईत देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी मजबूत वाढते. 

भाव का वाढले?
- जागतिक बाजारात मोठे चढ-उतार
- २०२४ मध्ये जगभर मंदी येण्याची भीती
- डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी
- जगभरातील बँकांकडून सोन्याची खरेदी
- वाढत्या महागाईमुळे सोन्याला साह्यच

नोव्हेंबर राहिला फायदेशीर
सोन्या-चांदीच्या भावाच्या बाबतीत नोव्हेंबर महिना गुंतवणूकदारांना फायदेशीर राहिला आहे. १ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव ६०,८९६ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तो आता ६१,८९५ रुपये झाला. १ नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव ७०,८२५ रुपये प्रति किलो होता, तो आता ७४,९९३ रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीच्या भावात ४,१६८ रुपयांची वाढ झाली आहे.

चांदी ७५ हजारांवर
चांदीचा भावही मंगळवारी १,९४७ रुपयांनी वाढून ७४,९९३ रुपये प्रति किलो झाला. आदल्या सत्रात चांदी ७३,०४६ रुपयांवर होती. या महिन्यात चांदीचा भाव ४ हजार रुपयांपेक्षाही अधिक वाढला आहे.

खरेदी करताना ही काळजी घ्या
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (बीआयएस) ६ अंकी (अक्षर व आकड्यांचा) हॉलमार्क असलेले प्रमाणित सोनेच 
खरेदी करा. 
सोन्याचे योग्य वजन आणि खरेदीच्या दिवशीचा भाव तपासूनच खरेदी करा. सोन्याचा भाव २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि कॅरेटनुसार वेगवेगळा असतो. 
सोने खरेदी करताना रोख पैसे देणे टाळा. त्याऐवजी यूपीआय अथवा अन्य डिजिटल बँकिंग सुविधा वापरा. खरेदीची पावती घ्यायला विसरू नका. 
गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करीत असाल, तर तुम्ही खरेदी करीत असलेल्या सोन्याच्या फेरविक्री मूल्याची माहिती जाणून घ्या. संबंधित ज्वेलरचे फेरखरेदी धोरण काय आहे, याचीही चौकशी करून घ्या. 

Web Title: ₹61,895! Gold's high, broke the record of May 4 in Ain Lagnasarai, silver also went up by Rs 4,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.