नवी दिल्ली : स्वामी रामदेव (Swami Ramdev) यांच्या कंपनी रुची सोया लिमिडेटने (Ruchi Soya Ltd.) 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. FMCG कंपनीने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत 234.43 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. नफा आणि उत्पन्नात मोठी उडी घेतल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
रुची सोया लिमिडेटच्या बोर्डाने आर्थिक वर्ष 2022 साठी 250 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या शेअरनुसार हिशोब केला तर तो प्रति शेअर 5 रुपये लाभांश आहे. दरम्यान, कोणत्याही कंपनीच्या शेअरच्या दर्शनी मूल्यावर लाभांश दिला जातो. रुची सोयाच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे, 250 टक्के दराने ते 5 रुपये आहे. रुची सोयाने दिलेला हा सर्वाधिक लाभांश आहे. यापूर्वी 2008 मध्ये कंपनीने 25 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली होती. योगगुरू स्वामी रामदेव यांनी 2019 मध्ये दिवाळखोरीनंतर रुची सोया विकत घेतली होती.
2022 मध्ये रुची सोयाचा नफाआर्थिक वर्ष 2022 मध्ये रुची सोयाच्या महसुलात 24284.38 कोटी रुपये किंवा 48.22 टक्के वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी हा महसूल 16382.97 कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत मार्च तिमाहीत रुची सोयाच्या उत्पन्नात 5.95 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रुची सोयाचे नाव बदलून 'पतंजली फूड्स लिमिटेड' करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.