नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद समूहाची कंपनी रुची सोयाचा (Ruchi Soya) फॉलो-ऑन पब्लिक ऑफर म्हणजेच एफपीओ (FPO) फेब्रुवारी 2022 च्या अखेरीस बाजारात येऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुची सोयाची 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ (FPO) फेब्रुवारीच्या अखेरीस बाजारात येऊ शकतो, ज्याला सेबीने आधीच मान्यता दिली आहे.
दरम्यान, रुची सोयामध्ये (Ruchi Soya) पब्लिक शेअर डोल्डिंग केवळ 1.1 टक्के आहे. सेबीच्या (SEBI) नियमांनुसार, री-लिस्टिंगच्या 18 महिन्यांच्या आत कंपनीसाठी आपले शेअर होल्डिंग 10 टक्क्यांपर्यंत वाढवणे बंधनकारक आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने रुची सोया 2019 मध्ये विकत घेतली होती.
पतंजलीने दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोयाला 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले होते. विशेष म्हणजे ज्या बँकांनी या खरेदीसाठी रुची सोयाला कर्ज दिले, त्यांनी याआधी रुची सोयालाही कर्ज दिले होते. पतंजलीच्या रुची सोयामधील जवळपास 99 टक्के भागीदारी बँकांकडे आहे. रुची सोयाची एफपीओद्वारे (FPO) मिळालेल्या पैशातून बँकांना पैसे परत करण्याची योजना आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही रुची सोयाचा शेअर हिरव्या चिन्हावर बंद झाला. रुची सोयाचा शेअर 1.60 टक्क्यांच्या वाढीसह 823 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, रुची सोयाचे मार्केट कॅपिटलायझेशन 24,352 कोटी रुपये आहे. पण हे पाहावे लागेल की रुची सोयाचा एफपीओ (FPO) कोणत्या किंमतीला जारी केला जाईल.