मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीची अंंमलबजावणी देशभरात चांगल्या प्रकारे होत असून प्राथमिक अहवालानुसार केबल व डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांची कपात झाल्याचा दावा ट्रायने केला आहे. महानगरांमध्ये १० ते १५ टक्के व ग्रामीण भागात ५ ते १० टक्के कपात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.शुल्कात वाढ झाल्याचा अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आरोप ट्रायतर्फे करण्यात आला. या नियमावलीमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहिन्यांची निवड करण्याची संधी मिळाली आहे. काही वाहिन्यांकडून त्यांनी तयार केलेली पॅकेजेस किंवा समूह वाहिन्या ग्राहकांवर लादण्यात येत असून अशा प्रकारांची गंभीर दखल ट्रायने घेतली आहे. त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिला.ग्राहकांना त्यांच्या पसंतीप्रमाणे एक एक वाहिनी अथवा समूह वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. याविरोधात कृती करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्या घरात एकापेक्षा अधिक टीव्ही संच आहेत त्यांना कोणत्या दराने सेवा पुरवावी याबाबत संभ्रम असल्याने याबाबत डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ओनर्स (डीपीओ) लवकरच निर्णय घेणार असून त्यावर ट्राय लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. ज्या ग्राहकांनी प्रीपेड सेवा स्वीकारली असेल त्यांना त्यांचे पॅकेज संपुष्टात येईपर्यंत कोणताही व्यत्यय आणू नये असे निर्देश देण्यात आले आहेत....खासगी ‘डीटीएच’ला कारणे दाखवाट्रायच्या नियमांची पायमल्ली करून ब्लॅकआउट केलेल्या खासगी डीटीएच कंपनीला ट्रायने कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत कारणे देण्यास सांगितले आहे. ट्रायने सदर कंपनीचे नाव प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलेले नाही. नवीन नियमावलीप्रमाणे वाहिन्यांची निवड करून त्याची माहिती देताना या कंपनीने काही काळ ब्लॅकआउट केल्याची तक्रार ट्रायकडे करण्यात आली आहे.
नियमावलीमुळे केबल-डीटीएच शुल्कात १५ टक्के कपात, ट्रायचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:16 AM
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीची अंंमलबजावणी देशभरात चांगल्या प्रकारे होत असून प्राथमिक अहवालानुसार केबल व डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांची कपात झाल्याचा दावा ट्रायने केला आहे.
ठळक मुद्देमहानगरांमध्ये १० ते १५ टक्के व ग्रामीण भागात ५ ते १० टक्के कपात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.शुल्कात वाढ झाल्याचा अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आरोप ट्रायतर्फे करण्यात आला.काही वाहिन्यांकडून त्यांनी तयार केलेली पॅकेजेस किंवा समूह वाहिन्या ग्राहकांवर लादण्यात येत असून अशा प्रकारांची गंभीर दखल ट्रायने घेतली.