Join us  

Rule Changing from 1 August : १ ऑगस्टपासून बदलणार पैशांशी निगडीत नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 3:47 PM

Rule Changing from 1 August : ऑगस्ट महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आर्थिकदृष्ट्या हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे.

Rule Changing from 1 August : ऑगस्ट महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आर्थिकदृष्ट्या हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक आर्थिक नियम बदलणार असून, त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अपडेट केल्या जातात. इंधन कंपन्या त्यांच्या किमती अद्ययावत करतात. याशिवाय ऑगस्टमध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत.

एलपीजी सिलिंडरची किंमत

एलपीजी सिलिंडरचे दर १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अपडेट केले जातील. एलपीजी सिलिंडरमध्ये घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा समावेश असतो. जुलै महिन्यात इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती. तर ऑगस्ट २०२३ मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये सिलिंडरच्या दरात कपात होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

गूगल मॅप्स

१ ऑगस्ट २०२४ पासून गुगल मॅप्सचे नियमही बदलत आहेत. गुगलनं भारतात आपल्या सर्व्हिस चार्जेसमध्ये ७० टक्के कपात केली आहे. याशिवाय आता डॉलरऐवजी रुपयात शुल्क भरले जाणार आहे. याचा फटका सर्वसामान्य युजर्सना बसणार नाही, त्यांच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेतलं जाणार नाही.

टॅग्स :सरकारपैसा