Lokmat Money > बिझनेस न्यूज > Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट

Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट

Rules Changed From 1st June 2024: आज म्हणजेच १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आणि आपल्या आयुष्यावर होणार आहे. पाहा कोणत्या नियमांत होणार बदल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:40 PM2024-06-01T12:40:11+5:302024-06-01T12:41:15+5:30

Rules Changed From 1st June 2024: आज म्हणजेच १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आणि आपल्या आयुष्यावर होणार आहे. पाहा कोणत्या नियमांत होणार बदल.

Rules Changed From 1st June 2024 driving license from June 1 a big update for SBI customers too credit card | Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट

Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट

Rules Changed From 1st June 2024: आज म्हणजेच १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आणि आपल्या आयुष्यावर होणार आहे. जे नियम बदलले जात आहेत त्यात ड्रायव्हिंग लायसन्स सर्वात महत्वाचा आहे. जाणून घेऊयात आजपासून कोणत्या नियमांमध्ये झालाय बदल.
 

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवा नियम
 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. १ जून २०२४ पासून कोणतीही व्यक्ती खासगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन आपली परीक्षा देऊ शकणार आहे. यापूर्वी या चाचण्या केवळ आरटीओ कार्यालयांमध्ये केल्या जात होत्या. या सर्व केंद्रांना चाचण्या घेण्याचे व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार शासनाकडून देण्यात येणार आहेत.
 

नव्या नियमांच्या माध्यमातून सरकारला सुमारे नऊ लाख जुनी वाहने हटवायची आहेत. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे.
 

... तर २५,००० रुपयांचा दंड
 

भरधाव वेगानं वाहन चालवल्यास १००० ते २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसंच अल्पवयीन वाहन चालवताना आढळल्यास त्याला २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. तर अल्पवयीन व्यक्तीला २५ वर्षांपर्यंत लायसन्सही मिळणार नाही.
 

आधार कार्ड अपडेट
 

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर १४ जूनपर्यंत करून घ्या. कोणीही सहजपणे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतो. तर, ऑफलाइन पर्याय निवडल्यास त्या व्यक्तीला ५० रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
 

जूनमध्ये बँका कधी बंद राहतील 
 

रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार जून महिन्यात १० दिवस बँका बंद राहणार आहेत. या दहा दिवसांत ५ रविवार आहेत. त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांनाही दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. याशिवाय काही सणांनिमित्तही देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहतील.
 

एसबीआय क्रेडिट कार्ड नियम
 

नुकतेच एसबीआय कार्डनं आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं की, काही क्रेडिट कार्डवर सरकारशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत. हा नियम आजपासून म्हणजेच १ जूनपासून लागू झाला आहे. बँकेने अशा क्रेडिट कार्डची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.

Web Title: Rules Changed From 1st June 2024 driving license from June 1 a big update for SBI customers too credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.