सध्या ई-कॉमर्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता आपल्याला लागणाऱ्या छोट्या-छोट्या वस्तुही आपण ऑनलाइन मागवून घेतो. पण, आता ऑनलाइन खरेदीमध्ये नवीन नियम आणले आहेत. यामध्ये आपल्याला आता काही वस्तु मिळणार नाहीत.
आता ग्राहक या प्लॅटफॉर्मवरून १०-२० रुपयांच्या बिस्किटे, चहा-कॉफीसारख्या छोट्या वस्तू ऑर्डर करू शकणार नाहीत. हे लगेच होणार नाही पण त्यासाठी तयारी आधीच सुरू झाली आहे. खरं तर, जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. कंपन्या या जलद ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लहान आणि परवडणाऱ्या पॅकचा पुरवठा करणार नाहीत. यामुळे लोकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कंपन्यांच्या मते, हे पॅक फक्त किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असणार आहे.
बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पार्लेने क्विक कॉमर्स कंपन्यांसाठी पार्ले-जी, हायड अँड सीक, क्रॅक जॅक सारखे बिस्किटांचे वेगवेगळे पॅक लाँच केले आहेत, या पॅकची किंमत ५०-१०० रुपयांच्या दरम्यान आहे. आता, ३० रुपयांपर्यंतच्या पार्ले बिस्किटांचे पॅक फक्त किराणा दुकानातच उपलब्ध असणार आहेत.
याशिवाय, रिलायन्स आणि डीमार्ट सारख्या रिटेल चेन १२० ते १५० रुपयांच्या बिस्किटांचे पॅक विकतील. यासोबतच, आयटीसीने क्विक कॉमर्ससाठी एंगेज परफ्यूम, सॅव्हलॉन हँडवॉश आणि मंगलदीप अगरबत्तीचे अनेक वेगवेगळे पॅक लाँच केले आहेत. तर अदानी विल्मर कंपनी जलद व्यापारासाठी स्वयंपाकाच्या तेलाचे नवीन पॅक लाँच करण्याची तयारी करत आहे.
या कारणामुळे निर्णय घेतला
देशात ऑनलाइन ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे किराणा दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. किराणा दुकान मालक याविरुद्ध आवाज उठवत होते. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, एफएमसीजी कंपन्यांनी हा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता या कंपन्या जलद व्यापारासाठी विशेष पॅकेजिंग करत आहेत.
सध्या, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लहान पॅकची विक्री वेगाने वाढत आहे. कंपन्यांनी हे पॅक या प्लॅटफॉर्मसाठी नाही तर फक्त दुकानदारांसाठी बनवले आहेत. आता किराणा दुकानातून हे पॅक विकले जात नाहीत, त्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. किराणा दुकानांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी, क्विक कॉमर्ससाठी वेगळे पॅकेजिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपन्यांचे ग्रामीण भागावर लक्ष
शहरी मागणी कमी झाल्यामुळे, FNCG कंपन्यांचे उत्पन्न कमी झाल्याचे दिसून येत आहे. उलट, देशातील ग्रामीण भागात मागणी वाढली आहे. या कंपन्या गावासाठी आणि शहरांसाठी वेगवेगळ्या किंमतीसह उत्पादन करत आहेत, यामुळे ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. काही दिवसापूर्वी अनेक कंपन्यांनी मोठ्या पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या पॅकपेक्षा कमी प्रमाणात प्रीमियम उत्पादनांचे छोटे पॅक लाँच केले आहेत.