Lokmat Money > बिझनेस न्यूज > १५ नोव्हेंबरपासून बदलणार ICICI Bank Credit Card शी निगडित 'हे' नियम; वापरापूर्वी जाणून घ्या

१५ नोव्हेंबरपासून बदलणार ICICI Bank Credit Card शी निगडित 'हे' नियम; वापरापूर्वी जाणून घ्या

नोव्हेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होत आहेत, यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचाही समावेश आहे. पाहा कोणत्या नियमांमध्ये होणार बदल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:19 AM2024-11-04T10:19:19+5:302024-11-04T10:19:19+5:30

नोव्हेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होत आहेत, यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचाही समावेश आहे. पाहा कोणत्या नियमांमध्ये होणार बदल.

rules related to ICICI Bank Credit Card will change from November 15 Know before use | १५ नोव्हेंबरपासून बदलणार ICICI Bank Credit Card शी निगडित 'हे' नियम; वापरापूर्वी जाणून घ्या

१५ नोव्हेंबरपासून बदलणार ICICI Bank Credit Card शी निगडित 'हे' नियम; वापरापूर्वी जाणून घ्या

नोव्हेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होत आहेत, यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचाही समावेश आहे. आघाडीच्या खाजगी बँकांनी त्यांच्या प्रायसिंग स्ट्रक्चर आणि बऱ्याच क्रेडिट कार्डवरील सवलती कमी करण्याची घोषणा केली आहे. लोअर्ड इन्सेटिव्ह्स कमी केल्यानं विमा आणि खाद्यपदार्थ खरेदी, एअरपोर्ट लाउंज अॅक्सेस, फ्युअल सरचार्ज आणि लेट पेमेंट चार्जेसवर त्याचा परिणाम होईल. बँकेनं आपल्या ग्राहकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे या बदलांची माहिती दिली आहे.

लाउंज अॅक्सेस चार्जेमध्ये वाढ  

नवे नियम लागू झाल्यानंतर ICICI Bank च्या क्रेडिट कार्ड होल्डर्सना पुढील तिमाहीमध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज अॅक्सेसचा लाभ घेण्यासाटी तिमाहीमध्ये ७५ हजार रुपये खर्च करावे लागतील. यापूर्वी लाउंज अॅक्सेससाठी ३५ हजार रुपयांची अट होती.

इन्शूरन्स आणि युटिलिटी स्पेंड 

बँकेनं काही क्रेडिट कार्डसाठी दरमहा ४० हजार रुपयांपर्यंत, तर काही कार्डसाठी ८० हजार रुपयांपर्यंत रिवॉर्ड पॉईंट्स मिळविण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

सरकारी खर्चावर रिवॉर्ड पॉईंट नाही 

आयसीआयसीआय बँक एमराल्ड मास्टरकार्ड मेटल क्रेडिट कार्डवर यापुढे सरकारशी संबंधित खर्चावर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत. सरकारी व्यवहारांसाठी मर्चंट कॅटेगरी कोड (एमसीसी) ६७६०, ९२२२, ९२११, ९३९९, ९४०२ आणि ९४०५ आहेत.

फ्युअल सरचार्ज

दरमहा ५० हजार रुपयांपर्यंतच्या इंधनाच्या खर्चावर फ्युअल सरचार्ज माफ करण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त असल्यास सरचार्ज माफीचा लाभ मिळणार नाही. आयसीआयसीआय बँक एमराल्ड मास्टरकार्ड मेटल क्रेडिट कार्डसाठी फ्युअल सरचार्ज माफ करण्यात आला आहे.

Web Title: rules related to ICICI Bank Credit Card will change from November 15 Know before use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.