भारताचे रुपे कार्ड (RuPay Card) लवकरच मालदीवमध्ये लाँच होणार आहे. यामुळे मालदीवच्या चलनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हे पाऊल अशा वेळी उचलले जात आहे, जेव्हा मालदीव आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध थोडे खराब झाले आहेत. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (NPCI) रुपे हे भारतातील जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेले पहिले कार्ड आहे. हे भारतात एटीएम, वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाते.
आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची रुपे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलन वापरण्यास सहमत आहेत. "भारताची रुपे सेवा सुरू केल्याने मालदीवियन रुफिया (MVR) ला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. डॉलरच्या समस्येवर तोडगा काढणे आणि स्थानिक चलन बळकट करणे हे सध्याच्या सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे", असे मोहम्मद सईद यांनी सांगितले.
दरम्यान, रुपे सेवा सुरू करण्याची कोणतीही तारीख त्यांनी जाहीर केली नाही. CorporateMaldives.com या न्यूज पोर्टलने गेल्या आठवड्यात मोहम्मद सईद यांचा हवाला देत हे कार्ड मालदीवमध्ये रुपयाच्या व्यवहारासाठी वापरले जाईल असे म्हटले होते. तसेच, आम्ही सध्या रुपयांमध्ये पेमेंट सुलभ करण्याचे मार्ग शोधण्यासाठी भारताशी चर्चा करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
'या' देशांमध्ये सुरु झालीय सेवाभारत सरकारने यूपीआय (UPI) मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. रुपे कार्ड सेवा जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये आतापर्यंत सात देशांचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्रान्स, सिंगापूर, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि यूएई यांचा समावेश आहे.