RuPay Debit Card Rules: सध्या देशात ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहार वाढलेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी डेबिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्याही देशात अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेबिट कार्डाच्या माध्यमातून एका दिवसांत पैसे काढण्यावर मर्यादा आहेत. देशात अनेक कंपन्या डेबिट कार्डची सेवा प्रदान करतात. यामध्ये रुपे कार्डला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. RuPay ने क्रेडिट कार्डही आणले आहे.
एका दिवसात एटीएम मशीनमधून रोख पैसे काढण्यासाठी आणि खरेदी व्यवहारांसाठी RuPay कार्ड मर्यादा बँकेवर अवलंबून असते. बँकांकडून एटीएम आणि पीओएस मशीनच्या व्यवहारांसाठी दैनंदिन मर्यादा लागू केली जाते. हे कार्डच्या प्रकारानुसार बदलू शकतात. RuPay डेबिट कार्डसाठी वार्षिक सदस्यता शुल्क बँकांवर अवलंबून असते.
रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून दिवसाला किती पैसे काढता येतात?
रुपे डेबिट कार्ड सरकारी योजना, क्लासिक, प्लॅटिनम, सिलेक्ट अशा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. देशाची सर्वांत मोठी बँक असलेल्या SBI ची देशांतर्गत ATM वर किमान व्यवहार मर्यादा १०० रुपये आणि कमाल व्यवहार मर्यादा ४० हजार रुपये आहे. दैनंदिन ऑनलाइन व्यवहाराची कमाल मर्यादा ७५ हजार रुपये आहे. तर, PNB Rupay NCMC प्लॅटिनम डेबिट कार्डवर दररोज एटीएम मर्यादा रुपये १ लाख आणि POS/Ecom एकत्रित मर्यादा ३ लाख रुपये प्रतिदिन आहे. बँकेने पैसे काढण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. पीएनबी एटीएमवर १५ हजार रुपये आणि इतर बँकेच्या एटीएमवर १० हजार रुपये निश्चित केले आहेत.
दरम्यान, HDFC बँकेची Rupay डेबिट कार्डवर डोमेस्टिक मर्यादा २५ हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे. दैनंदिन डोमेस्टिक शॉपिंग मर्यादा २.७५ लाख रुपये आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवर प्रतिदिन २००० रुपयांच्या कमाल मर्यादेसह व्यापारी आस्थापने (POS) येथे रोख पैसे काढण्याची सुविधा मिळवू शकतात. POS द्वारे दरमहा जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतात.