Lokmat Money > बिझनेस न्यूज > डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर?

डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर?

गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:27 AM2018-05-10T00:27:33+5:302018-05-10T00:27:33+5:30

गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Rupee at 70 against dollar? | डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर?

डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर?

नवी दिल्ली -  गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज रुपया आणखी १५ पैशांनी घसरल्याने एक डॉलरची किंमत ६७.२७ रुपये झाली आहे.
सूत्रांच्या मते, रुपयाची घसरण जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती व विदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर अवलंबून असेल. ‘मेकलाई वित्तीय सेवा’चे सीईओ जमाल मेकलाई म्हणाले की, रुपया ७0चा टप्पा गाठेल का, हे आता सांगणे शक्य नाही. गेल्या वेळी तो ६८.५पर्यंत घसरला होता. मात्र तेथून तो परत आला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि सरकारचे वाढते कर्ज यामुळे या वेळी रुपया ७0चा टप्पा गाठू शकतो.

Web Title:  Rupee at 70 against dollar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.