Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपया २२ पैशांनी खाली आला

रुपया २२ पैशांनी खाली आला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीची मिळविलेली वाढ त्याला गुरुवारी टिकवता आली नाही व बँका व आयातदारांकडून डॉलरला मागणी

By admin | Published: August 13, 2015 10:05 PM2015-08-13T22:05:36+5:302015-08-13T22:05:36+5:30

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीची मिळविलेली वाढ त्याला गुरुवारी टिकवता आली नाही व बँका व आयातदारांकडून डॉलरला मागणी

The rupee came down by 22 paise | रुपया २२ पैशांनी खाली आला

रुपया २२ पैशांनी खाली आला

मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीची मिळविलेली वाढ त्याला गुरुवारी टिकवता आली नाही व बँका व आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढताच तो २२ पैशांनी स्वस्त होऊन एक डॉलर ६५ रुपयांवर गेला.
बुधवारी बाजार बंद होता तेव्हा आंतर बँक व्यवहारात डॉलरचा भाव ६४.७८ रुपये होता. त्यावर गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच निर्यातदारांनी शेअर बाजारात तेजी येताच डॉलर विकायला सुरुवात करताच त्याचा भाव ६४.७२ रुपये झाला व नंतर तो ६४.६३ रुपयांवर स्थिरावला; परंतु सुरुवातीची वाढ रुपयाला राखता आली नाही. आयातदार आणि बँकांकडून डॉलरला मागणी वाढताच तो २० पैशांनी स्वस्त होऊन ६५ रुपये झाला.

Web Title: The rupee came down by 22 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.