मुंबई : बाजारातील तेजीच्या विपरीत रुपयात आज सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा आणखी काही काळासाठी कमीच व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉलरच्या तुलनेत आज रुपया 1क् पैशांच्या घसरणीसह दोन आठवडय़ांची नीचांकी पातळी 61.45 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया 61.45 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. अखेरीस 61.39 ते 61.55 रुपये प्रति डॉलरदरम्यान राहिल्यानंतर शेवटी 1क् पैशांच्या घसरणीसह 61.45 रुपये प्रति डॉलरवर आला.
गेल्या चार दिवसांमध्ये रुपयात 21 पैसे वा क्.37 टक्क्यांची घसरण नोंदली गेली आहे. (प्रतिनिधी)