Lokmat Money > बिझनेस न्यूज > डॉलरच्या तुलनेत रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर

डॉलरच्या तुलनेत रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ६८ रुपयांपेक्षा खाली आला होता. गेल्या २८ महिन्यांत प्रथमच रुपया ६८ पेक्षा खाली आला आहे

By admin | Published: January 21, 2016 03:10 AM2016-01-21T03:10:39+5:302016-01-21T03:10:39+5:30

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ६८ रुपयांपेक्षा खाली आला होता. गेल्या २८ महिन्यांत प्रथमच रुपया ६८ पेक्षा खाली आला आहे

Rupee down 28-month low against dollar | डॉलरच्या तुलनेत रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर

डॉलरच्या तुलनेत रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ६८ रुपयांपेक्षा खाली आला होता. गेल्या २८ महिन्यांत प्रथमच रुपया ६८ पेक्षा खाली आला आहे. अखेरीस रुपया २३ पैशांनी घसरून ६७.९५ वर बंद झाला.
विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेतल्याने आणि आयातदारांतर्फे डॉलरची जोरदार मागणी झाल्याने रुपयात घसरण झाली आहे. याशिवाय स्थानिक इक्विटी बाजारात घसरणीचा कल असल्यानेही रुपयावर दडपण आले.
बुधवारी आंतरबँक विदेशी बाजारात रुपया ६७.७७ वर खुला झाला आणि नंतर ६८ च्या स्तराच्या खाली गेला. बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरला. ४ सप्टेंबर २0१३ नंतर प्रथमच ६८.0७ च्या स्तरापर्यंत घसरला आहे.

Web Title: Rupee down 28-month low against dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.