मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ६८ रुपयांपेक्षा खाली आला होता. गेल्या २८ महिन्यांत प्रथमच रुपया ६८ पेक्षा खाली आला आहे. अखेरीस रुपया २३ पैशांनी घसरून ६७.९५ वर बंद झाला.विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेतल्याने आणि आयातदारांतर्फे डॉलरची जोरदार मागणी झाल्याने रुपयात घसरण झाली आहे. याशिवाय स्थानिक इक्विटी बाजारात घसरणीचा कल असल्यानेही रुपयावर दडपण आले.बुधवारी आंतरबँक विदेशी बाजारात रुपया ६७.७७ वर खुला झाला आणि नंतर ६८ च्या स्तराच्या खाली गेला. बुधवारी रुपया ४२ पैशांनी घसरला. ४ सप्टेंबर २0१३ नंतर प्रथमच ६८.0७ च्या स्तरापर्यंत घसरला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर
By admin | Published: January 21, 2016 3:10 AM