Join us

रुपया २0 पैशांनी घसरला

By admin | Published: June 30, 2015 2:28 AM

ग्रीकमधील कर्ज संकटामुळे आज रुपया २0 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ६३.८४ वर बंद झाला. युरोच्या तुलनेत रुपयात थोडी सुधारणा झाली आहे; मात्र पाऊंडाच्या तुलनेत

मुंबई : ग्रीकमधील कर्ज संकटामुळे आज रुपया २0 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ६३.८४ वर बंद झाला. युरोच्या तुलनेत रुपयात थोडी सुधारणा झाली आहे; मात्र पाऊंडाच्या तुलनेत त्यात घसरण झाली आहे.युरोच्या तुलनेत रुपया ७१.२५ वरून ७0.९७ वर गेला आहे. पाऊंडाच्या बाबतीत मात्र तो १00.0९ वरून १00.२९ वर घसरला. सकाळी विनिमय बाजारात रुपया खालच्या पातळीवर १ डॉलरला ६३.८0 रुपये या पातळीवर उघडला होता. त्यानंतर आणखी घसरण होऊन एका डॉलरची किंमत ६३.९४ रुपये झाली. सत्राच्या अखेरीस एका डॉलरची किंमत ६३.८४ रुपये झाली. २0 पैशांची अथवा 0.३१ टक्क्यांची घसरण त्यात झाली. गेल्या पाच सत्रांत रुपयाने ३२ पैसे अथवा 0.५0 टक्के मूल्य गमावले आहे. दिवसभरात रुपया ६३.८0 ते ६३.९0 या दरम्यान खालीवर होताना दिसून आला. न्यूयॉर्क बाजारात अमेरिकी डॉलर सर्व जागतिक चलनांच्या तुलनेत मजबूत झाल्याचे दिसून आले. - आशियाई बाजारांत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅगस्टच्या डिलिव्हरीसाठीचे दर ८२ सेंटांनी घसरून ५८.८१ डॉलर झाले. ब्रेंट क्रूड तेलाच्या आॅगस्टच्या डिलिव्हरीसाठीच्या किमती ७0 सेंटांनी घसरून ६२.५६ डॉलर झाल्या.