Join us

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 1:01 PM

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.  रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरली आहे.  गुरुवारी रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरुन 68.89 वर झाली.  

मुंबई - अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.  रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरली आहे.  गुरुवारी रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरुन 68.89 वर झाली.  

बुधवारी 37 पैशांनी घसरून रुपया डॉलरच्या तुलनेत 68.61 वर पोहोचला होता. गुरुवारी रुपयाच्या किंमतीची सुरुवातच 68.89 रुपये अशी निचांकी झाली. ही रुपयाची घसरण पाहता गेल्या 19 महिन्यांतली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीमागे कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तसेच, कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, यापूर्वी 24 नोव्हेंबर 2016 ला रुपयाचे मूल्य 68.86 पर्यंत घसरले होते. याशिवाय, अमेरिकेने भारतासह सर्व देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईराणहून कच्च्या तेलाची आयात बंद करण्यास सांगितले आहे. तसे केले नाही तर प्रतिबंध लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. तसेच, लीबिया आणि कॅनाडाहून पुरवठा कमी होण्याच्या शक्यतेनेही दर वाढले आहेत. 

टॅग्स :व्यवसाय